नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केरळ राज्यात पोलीस प्रशिक्षणार्थींच्या मेन्यूमधून बीफला हटवण्याचे वृत्त असताना केरळमध्ये पुन्हा एकदा बीफवरून राजकारण सुरु झाले आहे. अशातच आता मंगळवारी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कोझिकोड येथे मुक्कम पोलीस ठाण्यासमोर निषेध करत बीफ करी-ब्रेडचे वाटप केले आहे. केरळच्या प्रदेश काँग्रेस प्रदेश कमिटीचे सचिव के. प्रवीण कुमार यांनीच बीफ करीचे वाटप करायला सुरुवात केली.
यावरून केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे असणारा कल दिसून येत आहे. त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी लवकरच भेट घेत भाजपशी ताळमेळ साधत लोकनाथ बेहेरा यांना पोलिस महासंचालक केले, असे के. प्रवीण कुमार म्हणाले.
Kerala: Congress workers yesterday distributed beef curry & bread in front of Mukkam police station in Kozhikode district, over reports of beef dropped from menu for state police trainees. pic.twitter.com/os3NVBEwTV
— ANI (@ANI) February 18, 2020
गुजरात दंगली प्रकरणात लोकनाथ बेहेरा यांनी पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांना क्लीन चिट दिल्याचा आरोपही कॉंग्रेसने केला असून पिनाराई संघाचा अजेंडा राबवत आहेत. कॉंग्रेस राज्यभर पिनाराईंचा दुटप्पीपणाचा खुलासा करणार असून या आठवड्याच्या सुरुवातीलाच नव्या प्रशिक्षित पोलिस तुकडीसाठी मेनूच्या सेटमधून बीफ काढला गेला नाही, असे केरळ पोलिस विभागाने म्हटले.
मेस समितीच्या निर्णयानुसार ज्यामध्ये प्रशिक्षणार्थींचे प्रतिनिधी आणि पोलिस अधिकारी यांचा समावेश आहे, त्यांना आपापल्या भागात उपलब्ध असलेल्या अन्नासह निरोगी अन्न तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच प्रशिक्षणार्थ्यांना आहाराद्वारे आवश्यक ऊर्जा मिळविणे हा त्याचा हेतू आहे, असे केरळ पोलिसांनी त्यांच्या स्पष्टीकरणात म्हटले आहे.