नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केरळ मधील कोच्ची येथे एक धक्कदायक प्रकार समोर आला आहे, गुरुवारी एका तरुणाने 17 वर्षीय मुलीला जिवंत जाळून टाकले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुलीने आरोपीच्या प्रेमाचा स्वीकार केला नाही म्हणून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी मिथुन देखील आगीच्या तावडीत सापडला आणि त्याचाही मृत्यू झाला. केरळातील इंफो पार्कमधील कक्कानाड मधील हा धक्कादायक प्रकार आहे.बारावीला असलेल्या विद्यार्थिनीवर आरोपीने पेट्रोल टाकले आणि आग लावली. पोलिसांना संशय आहे की युवकाने स्वतःला जाळून घेण्यासाठी मुलीला आग लावल्यानंतर मुलीला मिठी मारली असावी.
रात्रीच मुलीच्या घरी पोहचला होता तरुण
आरोपीच्या तावडीतून मुलीला वाचवण्यासाठी तिच्या वडिलांनी प्रयत्न केले मात्र आगीचे प्रमाण खूप जास्त असल्यामुळे मुलीच्या वडिलांना तात्काळ रुग्णालयात भरती करावे लागले. पोलिसांच्या मते आरोपी मिथुन रात्री सव्वा बाराच्या सुमारास मुलीच्या घरी पोहचला होता जेव्हा मुलीच्या वडिलांनी दरवाजा उघडला तेव्हा त्याने मुलीला भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. मुलीने घरा बाहेर येताच मुलाने तिच्यावर पेट्रोल टाकले आणि आग लावली. शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहचले. मात्र रुग्णालयात जाईपर्यंत दोघांचा मृत्यू झाला होता.
पोलिसांकडून तपास सुरु
थ्रीक्काकारा चे आमदार पीटी थॉमस हे सुद्धा घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि घडलेली घटना निंदनीय असल्याचे सांगितले आणि याबाबत अधिक तपास करण्याची मागणी केली. या बाबतचा सखोल तपास सध्या पोलिसांनी सुरु केला आहे.
Visit : bahujannama.com