अहमदाबाद : वृत्तसंस्था – अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे स्वागत करण्यासाठी अहमदाबाद येथे तयारी सुरु असून ट्रम्प यांच्या भारत भेटीवेळी ते अहमदाबाद येथे एका भव्य-दिव्य रोड शोमध्ये सहभागी होणार आहेत. हा शो सुमारे १३ किलोमीटरचा असून नरेंद्र मोदी यांच्यासोबत ते साबरमती येथील आश्रमाला भेट देणार आहेत. तसेच सरदार वल्लभभाई पटेल या नवीन स्टेडियमचेही उद्घाटन करणार आहेत.
तर नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटरवरून प्रतिक्रिया देत डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी यांच्या भेटीमुळे आपल्याला आनंद होत असल्याचे म्हटले आहे.
Extremely delighted that @POTUS @realDonaldTrump and @FLOTUS will visit India on 24th and 25th February. India will accord a memorable welcome to our esteemed guests.
This visit is a very special one and it will go a long way in further cementing India-USA friendship.
— Narendra Modi (@narendramodi) February 12, 2020
डोनाल्ड ट्रम्प हे २४ फेब्रुवारी रोजी अहमदाबादमध्ये येणार असून एअरपोर्टवरून ते साबरमतीच्या गांधी यांच्या आश्रमात जातील. त्याच रस्त्याने ते पुन्हा एअरपोर्ट सर्कल ते इंदिरा ब्रिज असा प्रवास करत कोटेश्वर महादेव मंदिर आणि तेथून मेगीबा सर्कलवरून मोटेरा स्टेडियमवर पोहोचणार असून हा पूर्ण व्हीआयपी रास्ता बनवण्यासाठी सुमारे २.१३ कोटींचा खर्च होणार आहे.
तसेच ट्रम्प यांच्या भेटीदरम्यान त्यांची पत्नी मेलेनिया ट्रम्प यांना गुजरात सरकार संस्कृती आणि कलाकुसरीच्या नमुन्यांची भेट देणार आहेत. तर त्यांच्या भेटीमुळे गुजरात विधानसभेचा अर्थसंकल्प २४ फेब्रुवारीला सादर होणारा अर्थसंकल्प आता २६ फेब्रुवारीला सादर होणार आहे.