मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – आपण प्रवास करताना राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाक्यावर टोल भरतो परंतु त्या बदल्यात आपल्याला जी पावती दिली जाते ती मात्र आपण कुठेही ठेवून देतो. अनेकजण ही पावती जपून ठेवत नाहीत. परंतु तुम्हाला माहिती आहे का या पावतीच्या मदतीने तुम्ही केवळ प्रवासच नाही करू शकत तर या पावतीचे अनेक फायदे आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रवासादरम्यान टोल शुल्क देण्याच्या बदल्यात तुम्हाला काही सुविधा देतं याबद्दलच आपण जाणून घेणार आहोत. नॅशनल हायवेवरील टोल बूथवर तुम्हाला जी पावती मिळते त्यावर चार फोन नंबर पुढील किंवा मागील बाजूस लिहिलेले असतात. हे फोन नंबर हेल्पलाईन नंबर, क्रेन सर्व्हिस, अॅम्ब्युलन्स सर्व्हिस आणि पेट्रोल सर्व्हिसचे आहेत. हे चारही नंबर तुम्हाला नॅशनल हायवे ऑथोरिटी ऑफ इंडियाची साईट http://tis.nhai.gov.in/TollInformation?TollPlazaID=200 वरही मिळतील. या नंबरवर कॉल केल्यास ते त्वरीत उचलले जातात आणि त्वरीत मदत उपलब्ध केली जाते. याचे नेमके काय फायदे आहेत ते जाणून घेऊयात.
1) पेट्रोल नंबर-
जर प्रवासादरम्यान तुमच्या गाडीचं इंधन संपलं तर चिंता नको. कारण तुम्ही रस्त्याच्या बाजूला गाडी पार्क करून टोल भरलेल्या पावतीवरील हेल्प लाईन नंबर किंवा पेट्रोल नंबरवर कॉल करू शकता. यानंतर तुम्हाला 5 ते 10 लिटर पेट्रोल किंवा डिझेल पुरवलं जातं. परंतु तुम्हाला या इंधनची रक्क्म अदा करावी लागेल. पेट्रोल हेल्पलाईनसाठी तुम्ही 8577051000, 7237999944 यापैकी एका नंबरवर कॉल करू शकता.
2) हेल्पलाईन नंबर-
जर तुम्हाला कोणतीही अडचण असेल आणि काही मदतीची आवश्यकता असेल तर तुम्ही 1033 किंवा 108 वर कॉल करून मदत घेऊ शकता. ही सुविधा 24 तास सुरु असते.
3) मेडिकल इमर्जंसी नंबर-
नॅशनल हायवेवर प्रवासादरम्यान अनेकदा मेडिकल इमर्जंसीची स्थिती निर्माण होते. अशात पावतीवरील मेडिकल इमर्जंसी नंबरवर संपर्क साधत तुम्ही मदत घेऊ शकता. कोणतीही मेडिकल इमर्जंसी असेल तर कॉल केल्यानंतर 10 मिनिटांत अॅम्बुलन्स यायलाच हवी. यासाठी 8577051000 आणि 7237999911 हे दोन हेल्पलाईन नबंर आहेत. मुख्य म्हणजे ही सुविधा मोफत आहे. हलक्याशा उपचाराची गरज असेल तर ती मदतही केली जाते. तसे नसेल तर अॅम्ब्युलन्स तुम्हाला त्वरीत जवळच्या रुग्णालयात किंवा नर्सिंग होमपर्यंत नेते. सर्व नंबरची कॉल करून खात्रीही करण्यात आली आहे.
4) क्रेन नंबर-
जर प्रवासादरम्यान तुमचं वाहन खराब झालं तर, नॅशनल हायवेची त्वरीत मदत तुम्हाला मिळते. एका मेकॅनिकसोबत मदत तुमच्या गाडीपर्यंत पोहोचते. मेकॅनिक गाडीपर्यंत येणं तर फ्री आहे परंतु तुमच्या गाडीमध्ये जी खराबी आहे त्याचा चार्ज मात्र तुम्हाला द्यावा लागतो. जर तुमच्या समस्येचं समाधान झालं नाही तर क्रेन तुमच्या वाहनाला जवळच्या सर्व्हिस सेंटरला घेऊन जाते. यासाठी नॅशनल हायवे ऑथोरिटीचे 8577051000, 7237999955 दोन हेल्पलाईन नंबर आहेत.
हे नंबर कायम सोबत ठेवा
1) अॅम्ब्युलन्स हेल्पलाईन नंबर- 8577051000, 7237999911
2) पेट्रोल हेल्पलाईन नंबर- 8577051000, 7237999944
3) हेल्पलाईन नंबर- 1033 किंवा 108
4) क्रेन हेल्पलाईन नंबर- 8577051000, 7237999955