मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – सोनी वाहिनीवर प्रदर्शित होणाऱ्या ‘कोण बनेगा करोडपती’ (KBC)कार्यक्रमावर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. कार्यक्रमादरम्यान विचारलेल्या प्रश्नात शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केल्याने कार्यक्रमाचे अँकर आणि अभिनेते अमिताभ बच्चन आणि सोनी टीव्हीवर नागरिकांनी निषेध व्यक्त केला आहे.
सोशल मिडियावर सोनी टीव्ही आणि अमिताभ यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे. राजकीय पक्षांनी देखील माफीची मागणी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाने या संदर्भात निषेध करत आज सोनी टीव्हीसमोर निदर्शने केली आहेत. आज १२ वाजता सोनी कार्यालयासमोर कार्यकत्यांनी निषेध करणार असल्याचेच समजले.
आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करुन @sonykbc10 नी अपमान केला आहे..
लवकर माफी मागा नाही तर शो ची एक पण lifeline राहणार नाही !!— nitesh rane (@NiteshNRane) November 8, 2019
दरम्यान भाजप नेते आणि नवनिर्वाचित आमदार नितेश राणे यांनी सोनी वहिनीला माफी मागण्याची मागणी केली आहे. त्यांनी ट्विट करत, जर माफी मागितली नाही तर या कार्यक्रमाची लाईफलाईन शिल्लक राहणार नाही, अशी धमकी दिली आहे.
वास्तविक, गुजरातहून आलेल्या स्पर्धक शाहेदा चंद्रन यांना हा प्रश्न विचारण्यात आला. प्रश्न असा होता कि. ‘यांपैकी कोणता शासक मुघल सम्राट औरंगजेबाचा समकालीन होता ?’ असा प्रश्न अमिताभ यांनी विचारला. त्यासाठी
१)महाराणा प्रताप
२) राणा सांगा
३) महाराणा रणजित सिंग
४) शिवाजी
या दिलेल्या पर्यायांमध्ये शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केल्याने राज्यभरातून रोष व्यक्त केला जात आहे.
मुंबई @NCPspeaks च्यावतीने सोनी (Sony TV) कार्यालयावर आज निषेध मोर्चा…
कौन बनेगा करोडपती कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी नामोल्लेख केल्याच्या निषेधार्थ निदर्शने आज दि. ८ नोव्हेंबर दुपारी १२ वाजता मालाड मुंबई येथील सोनी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार आहे. pic.twitter.com/CAGS8HBMSf— NCP Mumbai (@MumbaiNCP) November 8, 2019
Visit : bahujannama.com