बहुजननामा ऑनलाइन : बॉलिवूडचे मेगास्टार बिग बी अमिताभ बच्चन पु्न्हा एकदा छोट्या पडद्यावर वापसी करण्यासाठी तयार आहेत. कौन बनेगा करोडपतीचा मंच पुन्हा एकदा सजला आहे. अमिताभ शोच्या नवीन एपिसोडची शुटींग करत आहेत आणि लवकरच चाहत्यांना त्यांचा हा आवडात कार्यक्रम पाहायला मिळणार आहे. बुधवारी अमिताभ यांनी शोच्या सेटवरून काही नवीन फोटो शेअर केले आहेत आणि सांगितलं आहे की, ते 12-14 तास काम करत आहेत.
अमिताभ बच्चन यांनी शोची शुटींग सुरू केली आहे आणि ते कायमच सेटवरून फोटो अपलोड करत असतात. प्रत्येक सीजनच्या सुरुवातीआधी अमिताभ असं करत असतात. यावेळचे फोटोही खूप इंटरेस्टींग आहेत.
कारण हे आहे की, ऑडियंसवाल्या सेक्शनच्या ठिकाणी स्क्रीन्स पाहायला मिळणार आहेत. अमिताभ यांनी शेअर केलेले हे फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांची एक्साईटमेंट आणखीच वाढली आहे. बिग बी देखील चाहत्यांसाठी खूप मेहनत घेताना दिसत आहेत.
अमिताब यांनी त्यांच्या ब्लॉगमध्येही कौन बनेगा करोडपती सीजन 12 चे काही फोटो शेअर केले आहेत. फोटो शेअर करताना त्यांनी लिहिलं की, “12-14 तास रोज काम. काम पूर्ण केल्यानंतर चकित झाल्यासारखं होतं की, आता पुढे काय राहिलं आहे. क्रू सोबत काम करायचं आहे आणि सपोर्ट जोडून ठेवण्याचं काम करायचं आहे.