बहुजननामा ऑनलाईन
कौन बनेगा करोडपती या शोचा नवा सीजन सुरू झाला आहे. आज (शुक्रवार दि 9 ऑक्टोबर) केबीसीच्या करमवीर या स्पेशल एपिसोडमध्ये मोहन फाऊंडेशनचे संस्थापक आणि मॅनेंजिग ट्रस्टी डॉ सुनील श्रॉफ दिसणार आहेत. मोहन फाऊंडेशन गेल्या 2 दशकांपासून अवयवदानासंदर्भात काम करत आहेत. याच एपिसोडमध्ये आणखी एख खास चेहरा दिसणार आहे तो म्हणजे बॉलिवूड स्टार रितेश देशमुख याचा. श्रॉफ याच्यासोबत सेलिब्रिटी गेस्ट म्हणून रितेश देशमुख केबीसीच्या हॉटसीटवर बसून खेळणार आहे. रितेश आणि त्याची पत्नी जेनेलिया देशमुख यांनी अलीकडेच अवयवदानाचा संकल्प केला होता. केबीसीच्या या एपिसोडमध्ये रितेश या संकल्पमागचा उद्देश सांगताना दिसणार आहे. यावेळी वडिलांच्या आठवणीनं रितेश भावूक झाल्याचं दिसून आलं.
https://twitter.com/SonyTV/
केबीसीच्या करमवीर स्पेशल या भागाचा प्रोमोही अलीकडेच सोशलवर रिलीज झाला. यात श्रॉफ यांच्या कार्याची माहिती देण्यात आली आहे. रितेश देशमुखही यावेळी वडिलांचा म्हणजेच माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचा उल्लेख करताना दिसतो. यावेळी तो इमोशनल होतो. त्यावेळी अवयव दान केलं असतं तर कदाचित वडिलांना वाचवता आलं असतं असं रितेश म्हणतो. काहीतरी केलं पाहिजे असं गेल्या अनेक वर्षांपासून आमच्या मनात होतं. जिवंतपणी मी माझ्या वडिसांसाठी काही करू शकलो नाही त्यामळं मी माझं शरीर तंदुरुस्त ठेवतो असंही रितेश प्रोमोमध्ये म्हणतो. सध्या खूप कमी अवयव दाता आहेत. अगदी गंभीर परिस्थिती असेल तर एखादा रिसिपंट या यादीत वरच्या स्थानावर येतो असंही तो नमूद करतो.
https://www.instagram.com/p/
अभिनेता अमिताभ बच्चन यांनी देखील काही दिवसांपूर्वी अवयव दान करण्याची शपथ घेतली होती. त्यांनी देखील ट्विट करून याबाबत सोशल मीडियावर माहिती दिली होती.