पुणे: Karve Road Nal Stop Chowk Accident | फर्ग्युसन महाविद्यालय (FC College Road) रस्ता येथे मित्राला भेटून सायकलने घरी परतत असताना कर्वे रस्त्यावर झालेल्या अपघातात कृष्णा देवळी यांचा मृत्यू झाला. रूरकी येथून त्यांनी हायड्रॉलॉजी या विषयात पदव्युत्तर अभियांत्रिकी (एमई) केले होते.
राज्य शासनाच्या पाटबंधारे विभागात ते कार्यरत होते. अतिशय शिस्तबद्ध असे देवळी हे कर्तव्य दक्ष अधिकारी म्हणून परिचित होते. अतिशय वक्तशीर, शिस्तबद्ध, आरोग्यप्रती जागरूक, बुद्धीमान, कामात चोख, असे कृष्णा गणपत देवळी.
आनंदनगर सनसिटी रस्ता (Anand Nagar Suncity Road) परिसरात ते राहत होते. शासनाच्या पाटबंधारे विभागात त्यांनी नोकरी केली. संभाजीनगर, पंढरपूर, नाशिक, पुणे येथे त्यांनी आपली सेवा बजावली.
मुळचे कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील गारगोटी या गावचे. १ जून १९५७ ही त्यांची जन्म तारीख. तर त्यांचा मृत्यू देखील १ जून रोजीच झाला. २०१५ साली ते सेवा निवृत्त झाले.
सेवानिवृत्तीनंतरही शासनासाठी सल्लागार म्हणून ते काम करीत होते. शासनाच्या विविध महत्त्वाच्या प्रकल्पांवर त्यांनी काम केले. अलमट्टी धरण, उजनी धरण इत्यादी कामात त्यांनी विशेष काम केले होते.
कर्नाटक महाराष्ट्र राज्यांच्या अलमट्टी धरणाच्या काम करणाऱ्या समितीत त्यांची वर्णी होती. गेली कित्येक वर्ष दिक्षीत डाएट ते करत होते. व्यायाम आणि योग्य आहार असला पाहिजे असा त्यांचा खाक्या होता. आरोग्याप्रती अतिशय जागरूक होते.
दररोज सकाळी व्यायामासाठी फिरायला जाणे अथवा सायकल चालविणे हा त्यांचा शिरस्ताच होता. दूरदूर सायकलवर जाणे, सिंहगड सर करणे, हे त्यांचे नेहमीचे. गेली कित्येक वर्ष ते डाएट करत होते. व्यायाम आणि योग्य आहार असला पाहिजे असा त्यांचा खाक्या होता.
कृष्णा देवळी यांच्या पश्चात पत्नी, उच्चशिक्षीत एक मुलगी, जावई आणि दोन नाती आहेत. दोन नातींचे ते लाडके आजोबा होते तर एकुलत्या एक मुलीसाठी ते आदर्श होते. पत्नी साठी तर ते सर्वस्वच होते. जावयावर त्यांचे मुलाप्रमाणेच ममत्त्व होते. अशा या परिवारातील ‘अण्णा’ गेल्याने त्यांच्यावर आभाळच कोसळले आहे.