Karuna Munde | ‘रूपाली चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून हटवा’ – करूणा मुंडे

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – Karuna Munde | राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) या आपल्या पदाचा गैरवापर करत असून त्यांना त्या पदावरून हटविण्यात यावे. अशी मागणी करूणा मुंडे (Karuna Munde) यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे केली आहे. तसेच याविषयीची तक्रार त्यांनी महिला आयोगाकडे देखील दाखल केली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
करूणा मुंडे यांनी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी लिहिले आहे की, ‘रुपाली चाकणकर त्यांच कामं निष्पक्षपातिपने करत नाहीत. या शिवाय अनेक गंभीर आरोप असलेल्या नेत्यांसोबत त्याचे फोटो समाजमाध्यमांवर दिसून येत आहेत. या शिवाय तक्रारदार महिलां आयोगात तक्रार घेऊन आल्यावर तेथून फोटो आणि व्हिडीओ त्या प्रसारित करतात यामुळे महिलांची ओळख समाजापुढे येत आहे.’ असा आरोप करूणा मुंडे यांनी रूपाली चाकणकरांवर केला आहे.
करूना मुंडे (Karuna Munde) पुढे लिहितात, ‘पीडित महिला त्यांच्याकडे न्याय मिळावा या हेतूने तक्रार घेऊन येतात, त्यांना न्याय तर भेटत नाही. उलट त्या महिलांसोबत फोटो आणि व्हिडिओ काढून ते समाजमाध्यमांवर प्रसारित करतात आणि राजकारण करतात. त्यामुळे उपमुख्यमंत्र्याकडे आणि केंद्रीय महिला आयोगाला ही तक्रार केली असल्याचे करुणा मुंडे यांनी यावेळी सांगितले आहे. या सर्व कारणांमुळे रुपाली चाकणकर यांची आयोगाच्या अध्यक्ष पदावरून मुक्तता करा.’ अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
दरम्यान, माध्यमांना दिलेल्या मुलाखतीमध्ये रूपाली चाकणकर यांनी आपल्याला निवडणुक लढवायला आवडेल.
असे सुतोवाच केले होते. तसेच खडकवासला या मतदारसंघातून आपल्याला निवडणुक लढविण्याची इच्छा आहे.
असे देखील त्या म्हणाल्या होत्या. खडकवासला या मतदारसंघातून
(Khadakwasla Assembly Constituency) २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत सचिन दोडके
(Sachin Dodke) यांचा थोडक्यात पराभव झाला होता. राष्ट्रवादीकडून (NCP) अनेक नेते या
मतदारसंघातून निवडणुक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. त्याबाबत विचारले असता, चाकणकर म्हणाल्या,
स्पर्धक असतील तर काम करायला आवडते. असेही यावेळी बोलताना चाकणकर म्हणाल्या.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Karuna Munde | karuna munde demand to chief minister over rupali chakankar
हे देखील वाचा :
Comments are closed.