कर्नाटक : वृत्तसंस्था – कर्नाटकाच्या एका तरुणाची चर्चा सोशल मीडियावर होत असून ट्विटर युजर्स या तरुणाने १०० मीटरची रेस फक्त ९.५५ सेकेंड मध्ये पूर्ण केल्याचा दावा करत आहेत. प्रसिद्ध ऍथलेट उसेन बोल्टने १०० मीटर रिलेची शर्यत ९.५८ सेकेंडमध्ये पूर्ण केली असल्याचा रेकॉर्ड केला होता. त्याच वेळी उसेन याचे रेकॉर्ड कोणी तोडू शकत नसल्याचे बोलले जात होते. पण या २८ वर्षीय तरुणाने हे रेकॉर्ड तोडल्याचा दावा केला आहे.
ट्विटरवर शेअर केलेल्या माहितीनुसार हा रेकॉर्ड तोडणाऱ्या तरुणाचे नाव श्रीनिवास गोवडा असून तो कर्नाटकमधील दक्षिण कन्नड जिल्ह्यातील मोडाब्रिदी या भागात राहणारा आहे. श्रीनिवास याने हे रेकोर्ड एका ‘कंबाला’ नावाच्या म्हशींच्या शर्यतीत केले आहे, असे ट्विटर युजर्सचा दावा आहे. ही शर्यत पाण्याने भरलेल्या धान्याच्या शेतात झाली होती. श्रीनिवासने या शर्यतीत १३.६२ सेकंदात १४२.५ मीटर अंतर पार केले. म्हणजे त्याने १०० मीटर केवळ ९.५५ सेकंदात पूर्ण केले, असा त्याचा अर्थ होतो.
https://twitter.com/raajcar/status/1227787733432561664
कर्नाटक मधील या तरुणाचे एक वैशिष्ट्य ते असे की, उसेन बोल्ट याने आपले रेकॉर्ड कोरड्या जमिनीवर बनवले असून श्रीनिवास याने हेच रेकॉर्ड पाण्याने भरलेल्या शेतात म्हशींच्या जोडीसह पळत बनवले आहे. या रेकॉर्डचा व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल झाला असून त्यात श्रीनिवास म्हशींच्या जोडीसह पळताना दिसून येत आहेत.
https://twitter.com/Lovernova1/status/1227990326490435584