बहुजननामा ऑनलाइन टीम – कर्नाटक सरकारचे ज्येष्ठ मंत्री के.एस. ईश्वरप्पा यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या खुर्चीची तुलना अभिनेत्री ऐश्वर्या रायशी केली आहे. ईश्वरप्पा यांनी एका वादग्रस्त विधानात म्हटले आहे की, प्रत्येक तरुण मुलाची इच्छा असते की त्याला ऐश्वर्या मिळावी, परंतु ऐश्वर्या तर एकच आहे. कर्नाटकचे ग्रामविकास व पंचायत राज्यमंत्री के.एस. ईश्वरप्पा शुक्रवारी पत्रकारांशी बोलत होते. यावेळी, जेव्हा अपात्र आमदारांनी पुन्हा निवडणूक जिंकल्यास त्यापैकी कोणाला राज्याचे उपमुख्यमंत्रिपद मिळेल, असे त्यांना विचारले गेले. या प्रश्नाला उत्तर देताना ईश्वरप्पा म्हणाले की, “कोणाला उपमुख्यमंत्रीपद नको आहे ? कोणाला सत्तेत पॉवर नको आहे, जेव्हा प्रत्येक मुलगा तरुण होतो, तेव्हा तो म्हणतो की आपल्याला ऐश्वर्या पाहिजे आहे, पण ऐश्वर्या तर एकच आहेत ”
ईश्वरप्पा म्हणाले की, नेत्यांमध्ये महत्वाकांक्षा तर असते, परंतु ती पूर्ण करण्यासाठी स्कोप असणे आवश्यक आहे, कारण प्रत्येकाला उपमुख्यमंत्री केले जाऊ शकत नाही. कर्नाटकच्या येडियुरप्पा सरकारमध्ये तीन उपमुख्यमंत्री आहे. कर्नाटकात 5 डिसेंबर रोजी पोटनिवडणूक झाली. विधानसभेमधून अपात्र ठरलेल्या 15 पैकी 13 नेत्यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढविली. त्याचा निकाल 9 डिसेंबर रोजी येणार आहे. कर्नाटकात सत्तेत राहण्यासाठी भाजपला किमान 6 जागा जिंकाव्या लागतील.
के.एस. ईश्वरप्पा यांनीही जेडीएस आणि कॉंग्रेसच्या आमदारांचे आभार मानले आणि म्हटले आहे की, जर त्यांनी आपल्या पक्षांचा राजीनामा दिला नसता तर कर्नाटकात भाजपाचे सरकार स्थापन झाले नसते. सध्याच्या कर्नाटक विधानसभेत 208 सदस्य आहेत. सध्या विधानसभेत अपक्षांसह भाजपचे 105 आमदार आहेत. तर कॉंग्रेसचे 66 आणि जेडीएसचे 34 आमदार आहेत. बसपाचाही एक आमदार निवडणूक जिंकले आहे.
Visit : bahujannama.com