बहुजननामा ऑनलाईन- कर्नाटकमधील भाजप सरकार आपल्या एका मंत्र्यामुळे चर्चेत आले. कर्नाटकचे एक्साइज मंत्री एच. नागेश यांनी सरकार लोकांना दारूची होम डिलीव्हरी सेवा देईल. अशी घोषणा केली. या घोषणेमुळे ते चांगलेच चर्चेत आले आहे. मात्र ही बातमी समजताच मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी एच. नागेश यांची खरडपट्टी काढली. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सध्या कर्नाटकचा मोठा भाग पुरामुळे त्रस्त आहे. अशा परिस्थितीत या घोषणेमुळे सरकारला जनतेचा रोष पत्कारावा लागू शकतो.
त्यामुळे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी नागेश यांना चांगलेच खडसावले. येडियुरप्पा यांनी नागेशला घरी बोलावून या विषयावर स्पष्टीकरण मागितले. तसेच ‘तुम्हाला अशी विधाने करायला कोणी सांगितले. तुम्ही अशा विषयावर माध्यमांशी चर्चा का केली. या प्रकारच्या योजना तुम्ही तुमच्या पर्यंतच ठेवा. कर्नाटकात सध्या पूरस्थिती आहे. तुमची अशी विधाने नवे वाद निर्माण करु शकतात. तसेच अजून एक पत्रकार परिषद घेऊन कर्नाटक सरकारची अशी कोणतीही योजना नसल्याचे स्पष्ट करा असे आदेशही दिले.
येडियुरप्पा यांच्या आदेशामुळे नागेश यांनी माध्यमांनी त्यांचे विधान चुकीच्या पद्धतीने घेतल्याचे सांगितले. मी फक्त उदाहरणे देत होतो की दारूची होम डिलीव्हरी सिस्टम बर्याच राज्यात आहे. मात्र कर्नाटक मध्ये असे काही करण्याचा माझा उद्देश नाही. माझ्या वक्तव्यामुळे दुखावलेल्या महिलांची मी माफी मागतो. आमचे उद्दीष्ट म्हणजे अवैध दारूपासून राज्याला मुक्त करणे आहे. दरम्यान, एस नागेश यांनी बुधवारी (ता.४) जर लोकांना घरात दारू पुरविली तर ड्रिंक अँड ड्राइव्ह च्या घटनांमध्ये घट होईल. दारू पिणाऱ्या अशा लोकांना कार्ड दिले जाईल. यानंतर त्यांच्या मागणीनुसार त्यांच्या घरी दारू पोहचविली जाईल असे विधान नागेश यांनी केले होते.