बहुजननामा ऑनलाईन : आजकाल लोक मोबाइल आणि इंटरनेटच्या आहारी गेले आहेत. आजूबाजूच्या लोकांपेक्षा ते नेहमी त्यांच्या मोबाईलवर व्यस्त दिसतात, हीच बाब कर्नाटकातील एका महाविद्यालयाच्या प्राचार्यांना इतकी लागली कि त्यांनी वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचे मोबाईल ताब्यात घेतले आणि हातोडीने त्यांचे तुकडे-तुकडे केले. प्राचार्यांचा असा मोबाईल तोडण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
दरम्यान, कर्नाटकातील एमईएस चेतन्य पीयू महाविद्यालयाच्या प्राचार्य क्लासरूमध्ये लेक्चरवेळी विद्यार्थ्यांचा मोबाईल वापरामुळे त्रस्त झाले होते. त्यांनी विद्यार्थ्यांना अनेकदा इशारा दिला होता की जर कोणताही विद्यार्थी अभ्यासाच्या वेळी किंवा वर्गात लेक्चर सुरु असताना मोबाईल वापरताना पकडला गेला तर तिथेच त्याचा मोबाइल तोडला जाईल. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सामान्य सूचना म्हणून याकडे दुर्लक्ष केले आणि वर्गात लेक्चरवेळी सर्वजण मोबाईलमध्ये व्यस्त झाले. हे पाहून मुख्याध्यापक इतके संतापले की त्यांनी तातडीने हातोडी मागून विद्यार्थ्यांचा मोबाइलने तोडायला सुरुवात केली.
प्राचार्यांच्या मोबाइलचा तोडण्याचा व्हिडीओ सगळीकडे व्हायरल झाल्यानंतर महाविद्यालयीन अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण दिले की, विद्यार्थ्यांनी आपला मोबाइल फोन लेक्चर दरम्यान देखील एकमेकांशी गप्पा मारण्यासाठी वापरला होता, त्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला.
गुरुवारी महाविद्यालयीन अधिकाऱ्यांनी अचानक तपासणीनंतर १६ मोबाइल फोन जप्त केले. यानंतर विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या सभागृहात जमा होण्यास सांगितले. विद्यार्थी जमल्यानंतर प्राचार्य तेथे पोहोचले आणि विद्यार्थ्यांसमोर असलेले मोबाइल तोडून टाकले.
कर्नाटकमधील काही शैक्षणिक संस्थांनी महाविद्यालयाच्या या निर्णयाचे समर्थन केले आहे. कर्नाटकमधील इंग्लिश मीडियम स्कूलचे सरचिटणीस डी. शशी कुमार एका मुलाखतीत बोलताना म्हणाले की, शाळा तसेच महाविद्यालयांमध्येही परिस्थिती हाताबाहेर जात आहे, त्यामुळे अशा शिक्षा आवश्यक आहेत.