नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांच्या मुलीलाही कोरोनाची लागण झाली आहे. तिला बंगळुरुच्या मणिपाल हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. येडियुरप्पा यांनी काल रात्री ट्विटकरुन त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली. माझी प्रकृती ठीक असून खबरदारीचा उपाय म्हणून मी रुग्णालयामध्ये दाखल झालो आहे असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले होते.
Karnataka CM BS Yediyurappa has been admitted to the hospital for observation. He is doing well, is clinically stable and will be monitored closely by our team: Manipal Hospital
Karnataka Chief Minister tested positive for COVID19 yesterday. (file pic) pic.twitter.com/s1OGKyjvGf
— ANI (@ANI) August 3, 2020
येडियुरप्पा यांना सुद्धा मणिपाल रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांची प्रकृती स्थिर आणि चांगली असल्याचे रुग्णालयांनी डॉक्टरांनी सांगितले. मणिपाल रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. येडियुरप्पा 78 वर्षांचे आहेत. त्यानंतर त्यांच्या मुलीची कोरोना चाचणी करण्यात आली त्यामध्ये मुलीलाही कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचाही कोरोना चाचणीचा रिपोर्ट काल पॉझिटिव्ह आला. यापूर्वी 25 जुलै रोजी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही ट्विट करुन मला कोरोनाची बाधा झाली आहे, अशी माहिती दिली होती. माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती ठीक आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे मी खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णालयामध्ये दाखल झालो आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वत:ला क्वारंटाइन करावे अशी मी विनंती करतो, असे ट्विट येडियुरप्पा यांनी केले आहे.