मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरने (Kareena Kapoor Khan) आपल्या लैंगिक जीवनाबाबत एक खुलासा केला आहे. माझा नवरा सैफ अली खान (Saif Ali Khan) याने जेहच्या वेळी मी गरोदर असताना मला खूप पाठिंबा दिला’, असं करिनाने म्हटलं आहे. मुख्यत: म्हणजे करीना कपूरने आपल्या दुसऱ्या बाळंतपणानंतर तिने ‘करिना कपूर खान्स प्रेग्नन्सी बायबल’ (Kareena Kapoor Khan’s) हे तिचं पहिलं पुस्तक प्रसिद्ध केलं होतं.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
नुकतंच दिग्दर्शक करण जोहरने इन्स्टाग्रामवर करिना कपूरची मुलाखत (Kareena Kapoor and Karan Johar interview) घेतली त्यामध्ये तिने काही खासगी गोष्टींचा खुलासा केला. ‘गरोदर असताना काही वेळा मला एकदम छान आणि सेक्सी वाटायचं, पण कित्येक वेळा माझा सेक्स ड्राईव्ह हरवून जायचा. अर्थात मला सेक्सची अजिबात इच्छा नसायची परंतु, या सर्वात सैफ अली खानने मला भरपूर पाठिंबा दिला. अगदी गरोदरपणाच्या सहा व्या-सात व्या महिन्यातही सैफ मला कॉम्प्लिमेंट्स द्यायचा. असे तिने म्हटलं आहे.
इन्टाग्रामवर आल्यापासून करिना चांगलीच अॅक्टिव्ह झाली आहे.
या ठिकाणी ती नियमितपणे आपले फोटोज शेअर (Kareena instagram) करुन फॅन्सना आपल्याबाबत अपडेट करत राहते.
काही दिवसांपूर्वीच तिने आपल्या दोन्ही मुलांसोबतचा एक फोटो शेअर केला होता.
‘माझ्या दोन्ही मुलांशिवाय माझं हे पुस्तक पूर्ण होऊ शकलं नसतं.
माझा हा प्रवास, अनुभव आणि त्यातून काय शिकले हे वाचण्यासाठी, पुस्तकाची प्री-ऑर्डर लिंक बायोमध्ये आहे.’ अशा आशयाचं कॅप्शन तिने या फोटोला दिलं होतं.
पुढे करीना म्हणते की, ‘जेव्हा एखादी स्त्री गरोदर असते, तेव्हा ती कशा प्रकारच्या मूड स्विंग्समधून जाते आहे हे कोणीही सांगू शकत नाही.
अशा वेळी तिच्या आजूबाजूच्या लोकांनी तिला समजून घेणं आवश्यक आहे.
जेव्हा मला स्वतःबद्दल छान वाटायचं त्यावेळी सैफ माझ्यासोबत होताच.
परंतु, ६-७ महिन्यांनंतर जेव्हा मी अतिशय थकलेली असायचे, मला काहीच करावसं वाटत नव्हतं,
अथवा काहीच नको वाटायचं तेव्हाही सैफ मला समजून घेत होता आणि माझ्यासोबत होता.
गरोदरपणात एखाद्या स्त्रीने सुंदरच दिसावं, अथवा नियमितपणे सेक्स करण्यास होकार द्यावा असा आग्रह पतीने धरू नये’,
असं करिनाने एका मुलाखती दरम्यान सांगितलं आहे.
दरम्यान, करण जोहरनेही याला दुजोरा देत, महिलांना समजून घेणं गरजेचं असल्याचं म्हटलं आहे.
Web Title :- Kareena Kapoor Khan | bebo kareena kapoor share her pregnancy up downs
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update