बहुजननामा ऑनलाइन टीम – नेटफ्लिक्स (Netflix) नं काही दिवसांपूर्वी बॉलिवूड सेलिब्रिटींच्या पत्नींना घेऊन एक वेब रिअॅलिटी शोचा ट्रेलर रिलीज केला होता. (Fabulous Lives of Bollywood Wives) असं या शोचं नाव होतं. फिल्ममेकर मधुर भांडारकर (Madhur Bhandarkar) या टायटलमुळं नाराज झाले होते. मधुर यांचा असा दावा आहे की, बॉलिवूड वाईव्स हे त्यांचं टायटल(Karan Johar apologizes to Madhur Bhandarkar) आहे. त्यांनी हे टायटल करणला देण्यास नकार दिला होता. मधुरनं शोचे निर्माते करण जोहर (Karan Johar) आणि अपूर्व मेहता (Apoorva Mehta) यांना आपल्या शोचं टायटल बदलण्याची विनंती केली होती. त्यांनी यासंदर्भात ट्विटही केलं होतं. यावर आता करण जोहरनं प्रतिक्रिया देत मधुर यांची माफी मागितली आहे.
करणनं एक लांबलचक पोस्ट शेअर केली आहे. ट्विटरवरून शेअर केलेल्या या पोस्टमध्ये करण म्हणतो की, आमच्या नव्या सीरिजचं नाव (Fabulous Lives of Bollywood Wives) आहे जे पूर्णपणे वेगळं आहे. मला नव्हतं माहीत की, तुम्हाला याचं वाईट वाटेल. याचा फॉरमॅट, कथा, टायटल सर्व काही वेगळं आहे. यानं तुमचं काम प्रभावित होणार नाही.
https://twitter.com/karanjohar/status/1331936030023323649?s=20
करण म्हणतो की, गेल्या काही आठवड्यात तुला जो काही त्रास झाला असेल, त्याबद्दल मी माफी मागतो. आपण या वादातून पुढं जाऊ.
काय म्हणाले होते मधुर ?
मधुरनं या संदर्भात ट्विट करत लिहिलं होतं की, प्रिय करण जोहर, अपूर्व मेहतानं मला वेबसाठी बॉलिवूड वाईव्स टायटल मागितलं होतं. यासाठी नकार दिला होता. कारण माझा प्रोजेक्ट निर्माणाधीन आहे. हे नैतिक आणि सैद्धांतिकदृष्ट्या चुकीचं आहे. तुम्ही टायटलला फेब्युलस लाईफ ऑफ बॉलिवूड वाईव्स करत वापरलं आहे. कृपया माझ्या प्रोजेक्टला बरबाद करू नका. माझी तुम्हाला नम्र विनंती आहे की, तुम्ही टायटल बदला.
Dear @karanjohar U & @apoorvamehta18 had asked me 4 the title #BollywoodWives for web,which I refused,as my project is underway. It is Morally & ethically wrong u to tweak it to #TheFabulousLivesofBollywoodWives. Pls do not dent my project. I humbly request u to change the title.
— Madhur Bhandarkar (@imbhandarkar) November 20, 2020
कधी आला होता ट्रेलर ?
फेब्युलस लाईफ ऑफ बॉलिवूड वाईव्स या रिअॅलिटी शोमध्ये बॉलिवूड स्टार्सच्या फेमस वाईव्सच्या आयुष्याची झलक दाखवली जाईल. या शोची निर्मिती करण जोहरचं प्रॉडक्शन हाऊस धर्मेटीक (Dharmatic) नं केलं आहे. ही कंपनी इंटरनेटसाठी कंटेट बनवते. अपूर्व मेहता धर्मेटीकचे सीईओ आणि निर्माता आहेत. या शोचा ट्रेलर नेटफ्लिक्सनं 13 नोव्हेंबर रोजी रिलीज केला होता.
4 fabulous queens here to grace your screen. #FabulousLives premieres 27th November, only on Netflix. https://t.co/epTmj4BS1D @maheepkapoor @neelamkothari @seemakkhan @bhavanapandey @NetflixIndia @apoorvamehta18 @aneeshabaig @scrappypants #UttamDomale
— Dharmatic (@Dharmatic_) November 13, 2020
कधी होणार रिलीज ?
या शोमध्ये संजय कपूरची पत्नी महीप कपूर, सोहेल खानची पत्नी सीमा खान, चंकी पांडेयची पत्नी भावना पांडे आणि समीर सोनीची पत्नी आणि अॅक्ट्रेस नीलम कोठारी दिसणार आहेत. ट्रेलरमध्ये शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खान, संजय कपूर, समीर सोनी, अनन्या पांडे, संजय कपूर हेदेखील दिसत आहेत. 27 नोव्हेंबर रोजी नेटफ्लिक्सवर हा शो रिलीज होणार आहे