पटणा : बहुजननामा ऑनलाईन – जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैय्या कुमार यांना कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया या पक्षाने बिहारच्या बेगूसरायमधून उमेदवारी घोषित केली आहे. बिहारमध्ये काँग्रेस- आरजेडी आणि हिंदुस्थान आवामी लीग या पक्षाची महाआघाडी झाली आहे.त्यांनी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मात्र यात सीपीआयला एकही जागा देण्यात आली नाही. त्यानंतर सीपीआयने कन्हैय्या कुमार यांची उमेदवारी घोषित केली आहे.
जेनऊ मधील देशद्रोहाच्या घोषणा दिल्या प्रकरणी तो देशभरात चर्चेला आला होता. कन्हैय्या कुमार बेगूसराय जिल्ह्यातील बरौनी प्रखंड अंतर्गत बिहट पंचायत क्षेत्रातील रहिवासी आहे.हा त्याचा मतदारसंघ आहे. मागील काही दिवसांपासून कन्हैय्या कुमार येथुन निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चाला उधाण आले होते. अखेर आज त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाला आहे. पण कन्हैय्या कुमार यांच्या समोर तगडे विरोधाक म्हणून भाजपचे खासदार व मंत्री गिरीराज सिंह असू शकतात त्यांच्या नावाची सध्या चर्चा सुरु आहे.
महाआघाडीने आज बिहारमधील उमेदवारांची यादी जाहीर केली. ज्यामध्ये लालू प्रसाद यादव यांच्या आरजेडी पक्षाच्या २० जागांपैकी १ जागा सीपीआयला (एमएल) देणार आहे. राजू यादव यांना उमेदवारी मिळू शकते. सीपीआयला महाआघाडीत जागा न दिल्याने सरचिटणीस सुधाकर रेड्डी यांनी नाराजी व्यक्त केली आहे.