मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – अभिनेत्री कंगना रनौतचे ट्विटर हँडल सस्पेंड करण्यात आले आहे. ट्विटरच्या नियमांचे उल्लंघन करणारी पोस्ट शेअर केल्यामुळे तिच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. पश्चिम बंगाल हिंसाचारावरील ट्विटनंतर ट्विटरने कंगनाचे अकाऊंट सस्पेंड केले. पश्चिम बंगालमध्ये झालेल्या निवडणुकीचा निकाल नुकताच लागला आहे. निकालानंतर पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार उफाळून आला आहे. बंगालमधील कथित हिंसाचाराबद्दल अभिनेत्री कंगना रणौतने अक्षेपार्ह ट्विट केले होते.
https://twitter.com/YamrajFromHell/status/1389474603802763264
ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वात टीएमसी विजयी झाल्यानंतर कंगानाने पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली होती. कंगनाने मायक्रो-ब्लॅगिंग साईटच्या नियमांचे उल्लंघन केले आहे. नियमांच्या विरोधात पोस्ट केल्याने तिचे ट्विटर अकाऊंट सस्पेंड करण्यात आले आहे.
https://twitter.com/NumbKhopdi/status/1389477297682632707
कंगनाने काय म्हटले ?
कंगनाने तिच्या ट्विटमध्ये लिहिले होते की, मी चूक होते, ती रावण नाही. रावण तर सर्वोत्कृष्ट राजा होता. त्याने जगातला सर्वोत्कृष्ट देश बनवला, एक महान प्रशासक, अभ्यासक आणि वीणावदक होता आणि आपल्या प्रजेचा राजा होता. ती एक रक्तपात करणारा राक्षस आहे. ज्या लोकांनी त्यांना मतदान केले आहे, त्यांचे हात