मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – प्रसिद्ध अभिनेत्री कंगना राणौतच्या बॉडीगार्डवर मुंबईतील डी एन नगर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुमार हेगडे असे या बॉडीगार्डचे नाव आहे. याबाबत एका मेकअप ऑटिस्टने डीएन नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
Mumbai | A case under Sec 376 (rape charges) & 420 (cheating) of IPC registered against bodyguard of a famous Bollywood actress at DN Nagar PS in Andheri. He is yet to be arrested. Complainant alleged that he promised marriage to her & took Rs 50,000: DN Nagar Police (21.05)
— ANI (@ANI) May 22, 2021
त्यानुसार, कुमार हेगडे याची व या तरुणीची २०१३ मध्ये ओळख झाली होती. गेल्या वर्षी जूनमध्ये हेगडे याने या तरुणीला लग्नाचे आमिष दाखविले. तिच्या फ्लॅटवर जाऊन तिच्याशी वारंवार शारिरीक संबंध निर्माण केले. तसेच तिच्याकडून २७ एप्रिल रोजी ५० हजार रुपये घेतले व तो पळून गेला आहे. या तरुणीची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर पोलिसांनी बलात्कार आणि फसवणूक अशा ३७६ आणि ४२० कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे.