बहुजननामा ऑनलाईन टीम : बॉलिवूड स्टार कंगना रणौत (Kangana Ranaut) आपल्या बिनधास्त वक्तव्यांसाठी ओळखली जाते. गेल्या काही दिवसांपासून ती आपल्या वक्तव्यांमुळं वादात सापडताना दिसत आहे. अलीकडेच तिनं इन्स्टावर लहानपणीचा एका फोटो शेअर केला. यासोबत तिनं लहानपणाशी संबंधांत एक सिक्रेट आणि खोल डोळ्यांचं कारणही सांगितलं आहे.
कंगनानं तिच्या इन्स्टावरून एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो तिच्या लहानपणीचा आहे. फोटो शेअर करताना तिनं लिहिलं की, लहानपणी मला आठवत नाही की, मी मुलांसोबत खेळायचे. त्यावेळी मला माझ्या डॉलसाठी फॅन्सी गाऊन किंवा कपडे बनवायला खूप आवडायचं. मला तासनतास चिंतन करायला आवडायचं. मी खूप विचार करायचे म्हणून गंभीर, खोल मॅच्युर डोळे. दुर्दैवानं काही लोक जन्मत:च मोठे असतात. त्यापैकीच मी एक आहे.
कंगनानं शेअर केलेली पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी तिच्या या पोस्टवर कमेंट करत प्रतिक्रियादेखील दिल्या आहेत.
कंगनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर काही दिवसांपूर्वीच ती पंगा सिनेमात दिसली होती. लवकरच ती आगामी सिनेमा थलायवीमध्ये दिसणार आहे. तमिळनाडूच्या राजकारणातील एक मोठं नाव तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री दिवंगत जयललिता यांच्या बायोपिकमध्ये जयललिता यांची भूमिका कंगना साकारणार आहे. याशिवाय ती तेजस आणि धाकड या सिनेमातही काम करताना दिसणार आहे.