बहुजननामा ऑनलाइन टीम – कंगना राणावतच्या(Kangana Ranaut) अडचणी कमी होताना दिसत नाहीत. एकच दिवसापूर्वी कंगना राणावतच्या(Kangana Ranaut) विरूद्ध धार्मिक द्वेष पसरवण्याच्या आरोपाखाली बांद्रा हायकोर्टाने खटला दाखल करण्याचा आदेश दिला आहे. याच्या बरोबर एक दिवसानंतर कंगना राणावतला सोशल मीडियावर एका वकिलाने रेपची धमकी दिली आहे.
माझे अकाऊंट हॅक झाले
मात्र, काही वेळानंतरच वकिलाने फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याचे म्हटले आणि आपले अकाऊंट डिलिट केले. मंगळवारी बॉलीवुड अभिनेत्री कंगना राणावतला रेपची धमकी एका वकिलाने सोशल मीडियावर दिली. वकिलाने कंगना राणावतच्या त्या पोस्टवर ही धमकी दिली, ज्यामध्ये तिने नवरात्रीच्या उत्सवाबाबत लिहिले होते. थोड्याच वेळात जेव्हा प्रकरण तापले, तेव्हा वकिलाने माफीसुद्धा मागितली आणि स्पष्टीकरण दिले की त्याचे खाते हॅक झाले होते.
ओडिसाच्या वकिलाने लिहिली पोस्ट
कंगना राणावतला रेपची धमकी देणार्या वकिलाचे नाव मेहंदी रजा असून तो ओडिसाचा आहे. त्याने कंगनाला मॅसेज करून म्हटले होते की, शहराच्या मध्यभागी तुझ्यावर रेप झाला पाहिजे. ट्विटरवर वकिलाच्या कमेंटनंतर यूजर्सने मेहंदी राजाला चांगलेच सुनावले. यानंतर थोड्यावेळाने वकिलाने अकाऊंट हॅक झाल्याचे सांगत माफी मागून अकाऊंट डिलिट केले.
वकिलाने लिहिला माफीनामा
वृत्तानुसार, मेहंदी रजा ओडिसाच्या झारसुगडा जिल्हा आणि सेशन कोर्टमध्ये अॅडव्होकेट आहे. रजाच्या विरूद्ध तक्रार दाखल झाली आहे. मात्र, रजाने एक माफीनामा सुद्धा लिहिला, ज्यात म्हटले आहे – आज माझे फेसबुक आयडी सायंकाळी हॅक झाले आणि काही आक्षेपार्ह कमेंट पोस्ट केले गेले. एक महिला आणि समजासाठी माझे हे विचार नाहीत.
कंगनाने पोस्टमध्ये हे लिहिले होते
कंगना राणावतने आपल्या पोस्टमध्ये लिहिले होते, कोण-कोण नवरात्रीचा उपवास करत आहे? फोटो आजच्या सेलिब्रेशनचा आहे, कारण मी उपवास केला आहे. या दरम्यान माझ्याविरूद्ध आणखी एक एफआयआर झाली आहे. महाराष्ट्रात पप्पू सेना माझ्या पाठी वेडी झाली आहे. माझी जास्त आठवण काढू नका, मी लवकरच येईन.