बहुजननामा ऑनलाइन टीम – बॉलिवूड अॅक्ट्रेस कंगना रणौत (Kangana Ranaut) आपल्या बिंधास्त वक्तव्यांसाठी ओळखली जाते. सोशलवर ती कायमच अॅक्टीव्ह असते. कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावर ती भाष्य करतच असते. अनेकदा ती वादातही सापडली आहे. आज पुन्हा एकदा तिनं आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना घेऊन ट्विट केलं ज्यामुळं ती चर्चेत आली आहे. आज प्रजासत्ताक दिनानिमित्त शेतकऱ्यांकडून रॅली काढण्यात आली होती. ही रॅली रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रु गॅसचा मारा केला. काही ठिकाणी तर लाठी चार्जही केला गेला. शेतकऱ्यांविरोधात घेतल्या गेलेल्या या अॅक्शनचा अनेक सेलेब्सनं विरोध केला. अलीकडचे कंगनानंही शेतकऱ्यांवरून ट्विट केलं. काही तरी लाज बाळगा असं कंगना तिच्या ट्विटमध्ये म्हणाली आहे. ट्विटमुळं कंगना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
कंगना आपल्या ट्विटमध्ये लिहिते की, कळप बनून राहिलेत. आडाणी, गल्लीत कोणाच्या घरी लग्न असो किंवा चांगला सण आला असेल तर जळके ताऊ, काका, काकू कपडे धुणं, किंवा मग लहान मुलांना अंगणात शौचास बसवणं किंवा खाट टाकणं, भर अंगणात दाऊ पिऊन नागडं होणं. हेच हाल झालेत या देशाचे. आज तरी लाज बाळगा. कंगनानं आपल्या ट्विटमध्ये रिपब्लिक डे चा हॅशटॅगही वापरला आहे.
https://twitter.com/KanganaTeam/status/1353966011217805312?s=20
कंगनाचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी यावर कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी हे ट्विट शेअर देखील केलं आहे. सध्या सोशल मीडियावर तिच्या ट्विटची खूप चर्चा सुरू आहे.
शेतकरी रॅलीबद्दल बोलायचं झालं तर ही रॅली दिल्लीच्या आयटीओ आणि नंतर लाल किल्ल्यापर्यंत पोहोचली. लाल किल्ल्याच्या आत जाऊनही गोंधळ झाला. पोलिसांनी याआधी असा दावा केला होता की, दिल्लीला येणाऱ्या सर्व बॉर्डर सील आहेत. परंतु शेतकरी आंदोलन नियंत्रणाबाहेर झालं. दिल्ली पोलिसांच्या सूत्रांच्या मते, गाझीपूर बॉर्डर जवळ शेतकऱ्यांनी बॅरिकेड्स तोडले होते. शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीचेही काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यात पोलीस शेतकऱ्यांवर लाठी चार्ज करताना दिसले होते.
कंगनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच ती पंगा सिनेमात दिसली होती. लवकरच ती आगामी सिनेमा थलायवी मध्ये दिसणार आहे. तमिळनाडूच्या राजकारणातील एक मोठं नाव तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री दिवंगत जयललिता यांच्या बायोपिकमध्ये जयललिता यांची भूमिका कंगना साकारणार आहे. याशिवाय ती तेजस आणि धाकड या सिनेमातही काम करताना दिसणार आहे.