नवी दिल्ली : वृत्तसंस्था – या हत्येच्या एक दिवस आधी म्हणजे १७ ऑक्टोबरला हिंदू महासभेचे कमलेश तिवारी यांनी ट्विटरवर एक यादी शेअर केली होती. ही यादी मशिदीची आहे. या यादीमध्ये मशिदींच्या नावाप्रमाणेच मंदिरांची नावेदेखील देण्यात आली आहेत. या मशिदी कोणत्या शहरात आहेत हे देखील सांगण्यात आले आहे. ही यादी सामायिक करण्यामागे हा हेतू होता.
कमलेश तिवारी यांनी आपल्या हत्येपूर्वी सामायिक केलेल्या यादीमध्ये १६ मशिदींची नावे दिली गेली आहेत. त्यांच्याबरोबर मंदिरांची नावे लिहून असे म्हटले आहे की, ही मंदिरे फोडून या मशिदी बांधल्या गेल्या आहेत. यादीत अयोध्याच्या राम मंदिराचा उल्लेख सहाव्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर पहिल्या व दुसर्या क्रमांकावर वाराणसीची ज्ञानवापी व आलमगीर मशिदीचा उल्लेख आहे. यादीतील शेवटचे नाव १६ व्या क्रमांकावर मथुराच्या ईदगाह बद्दल लिहिले गेले आहे. कमलेश तिवारी यांनी ट्विटरवर यादी सामायिक करण्याबरोबरच दोन संदेशही लिहिले आहेत. पहिल्या संदेशात त्यांनी लिहिले आहे की, ‘श्री राम मंदिरासोबतच अशी अनेक मंदिरांचे पुनर्वसन होणार आहे. संघर्ष करा हिंदूंनो .’ त्याच वेळी त्यांनी दुसऱ्या संदेशामध्ये लिहिले की, ‘आज भारतात हजारो मंदिरांच्या जागी मशिदी उभ्या आहेत.’
https://twitter.com/kamleshtiwari03/status/1184747894219235328
दरम्यान कमलेश तिवारी यांची शुक्रवारी लखनऊमध्ये घरात हत्या करण्यात आली. आधी त्याच्यावर गोळ्या झाडल्याची माहिती मिळाली होती, परंतु डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार धारदार शस्त्राने गळा कापून तिवारी यांनी हत्या करण्यात आली आहे. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळावरून एक रिवॉल्व्हर जप्त केली. कमलेश तिवारीच्या ओळखीच्या व्यक्तीकडून खून घडवून आणला असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. घटनेनंतर आरोपी फरार आहे.राज्य सरकारने या हत्येच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना केली आहे. पोलिस या प्रकरणातील आरोपींच्या शोधात व्यस्त आहेत.
Visit : bahujannama.com