बहुजननामा ऑनलाईन टीम : हिंदू समाज पक्षाचे नेते कमलेश तिवारी हत्या प्रकरणात एक नवीन खुलासा झाला आहे. स्पेशल टास्क फोर्स (ATS) च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्येचा आरोपी अशफाकने प्लानचा भाग म्हणून रोहित सोलंकी नावाचे फेसबुक प्रोफाइल तयार केले होते आणि त्या माध्यमातून त्याने कमलेश तिवारीशी फेसबुकवर मैत्री वाढविली होती. बनावट फेसबुक आयडीच्या माध्यमातून त्यांनी कमलेश तिवारी यांच्याशी फोनवर जवळून संवाद साधला आणि संघटनेत सामील होण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर त्यांची भेट निश्चित झाली होती.
कमलेश तिवारी हत्याकांडानंतर त्यांचा नोकर स्वराष्ट्रजीत सिंग यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोर येण्यापूर्वी तिवारी यांच्याशी फोनवर १० मिनिटे बोलले होते. त्यानंतर ते कार्यालयात पोहोचले आणि कमलेश तिवारी यांच्याशी सुमारे अर्धा तास बोलला. हल्लेखोरांनी नोकराला सिगारेट आणण्यासाठी बाहेर पाठवून ही घटना घडवून आणली.
भगव्या वस्त्र धारक हल्लेखोरांनी मिठाईच्या डब्यात चाकू व कट्टे घेऊन खुर्शीद बाग परिसरातील तिवारी कार्यालयात घुसले होते. सीसीटीव्ही कॅमेर्यानुसार हल्लेखोरांनी कमलेश तिवारीच्या हनुवटी आणि छातीवर चाकूने १५ हून अधिक वार केले आणि हल्ला केल्यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला. दरम्यान, कमलेश तिवारी हत्या प्रकरणात ATS ला मोठा पुरावा मिळाला आहे. लखनौच्या हॉटेल खालसा येथून काही वस्तू जप्त करण्यात आल्या असून त्यामध्ये बॅग आणि रक्ताने माखलेला भगवा कुर्ता यांचा समावेश आहे. सध्या पोलिसांसह फॉरेन्सिक टीम या प्रकरणाचा तपास करत आहे. हॉटेल मालकाचीही चौकशी केली जात आहे.
Visit : bahujannama.com