कलयुग ! प्रियकरानं 4 मित्रांच्या मदतीनं आळीपाळीनं केला बलात्कार, घटनेचा व्हिडीओ व्हायरल

rape
January 13, 2021

बहुजननामा ऑनलाइन टीम – प्रियकरानेच मित्रांच्या मदतीने आपल्यावर आळीपाळीने बलात्कार केल्याचा आरोप अल्पवयीन तरुणीने केला आहे.( raping ) इतकच नव्हे तर आपले आक्षेपार्ह व्हिडीओदेखील शूट करून ते व्हायरल केल्याचेही तीने म्हटले आहे. उत्तर प्रदेशातील बरेली येथे ही घटना समोर आली आहे. या प्रकरणी पीडितेच्या कुटुंबाने दिलेल्या तक्रारीवरून प्रियकर व त्याच्या मित्राविरोधात पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे.

पीडितेने पोलीस तक्रारीत म्हटले आहे की, प्रियकराने लग्नाचे आमिष दाखवून गेल्या एक वर्षांपासून आपल्यावर लैंगिक अत्याचार करत होता. आरोपीने आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडीओ मोबाइलमध्ये रेकॉर्ड केले असून ते जानेवारीला व्हायरल केले.

यानंतर त्याने आपल्याला ब्लॅकमेल केले आहे. त्याच्या मित्रांकडूनही आपल्यावर आळीपाळीने बलात्कार करण्यात आला. आरोपीने शूट केलेले व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांकडून तक्रार दाखल केली आहे. आरोपीचा तसेच व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांचा पोलीस शोध घेत आहेत.