पुणे : – Kalyani Nagar Porsche Car Accident Pune | पुण्यातील कल्याणी नगर येथील पोर्शे कार अपघात प्रकरणात दररोज नवनवीन माहिती समोर आली आहे. अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी ससूनमधील (Sassoon Hospital) डॉक्टरांनी आणि अग्रवाल कुटुंबियांनी (Agarwal Family) ब्लड सॅम्पल बदलल्याची माहिती समोर आली होती (Blood Sample Tampering Case Pune). याप्रकरणी ससून मधील दोन डॉक्टरांना अटक केली. अपघात प्रकरणाशी संबंधित प्रत्येक व्यक्तीची सध्या कसून चौकशी सरु आहे. याप्रकरणी आतापर्यंत 10 जणांना अटक करण्यात आली आहे.
पुण्यातील कल्याणीनगर येथे 19 मे रोजी झालेल्या हिट अँड रन अपघात प्रकरणाने देशात खळबळ माजवली. अल्पवयीन मुलाने पोर्शे गाडीने दोन जणांना चिरडले. या प्रकरणामुळे राज्यातील वातावरण तापले. आता पुणे पोर्शे कार अपघातात भारतीय लष्कराची (Indian Army) मदत घेण्यात येणार आहे. लष्कराच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने पोर्शे कारच्या अपघाताचे विश्लेषण केले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. एका अधिकाऱ्याने एका वृत्तवाहिनीला सांगितले की, हा अहवाल या खटल्याच्या चाचणी टप्प्यात मदत करेल. या अहवालावरुन या वाहनाचा अपघात कसा झाला हे पोलीस आणि न्यायालयाला कळणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल (Vishal Agarwal Builder) याच्या 17 वर्षाच्या मुलाने दारूच्या नशेत भरधाव वेगात पोर्शे गाडीने दुचाकीला धडक दिली. यामध्ये दोन आयटी अभियंत्यांचा जागीच मृत्यू झाला. अनिश अवधिया Aneesh Awadhiya (वय-27) आणि अश्विनी कोस्टा (Ashwini Costa) यांचा अपघातात जागीच मृत्यू झाला हा अपघात कल्याणी नगर परिसरात रविवारी (दि.19 मे) मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास झाला होता. पोर्शे कार एवढी वेगात होती की अश्विनी कोष्टा 15 फूट दूर फेकली गेली.
याप्रकरणी अल्पवयीन मुलाविरोधात येरवडा पोलीस ठाण्यात (Yerawada Police Station) आयपीसी 279, 304(a), 337, 338, 427 आणि मोटार वाहन कायदा कलम 184 आणि 119/177 या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अकीब रमजान मुल्ला यांनी याबाबत फिर्याद दिली होती.