बहुजननामा ऑनलाईन – सुपरहिट चित्रपटांमध्ये नाव गाजवलेले दिवंगत जेष्ठ अभिनेते कादर खान यांचा मोठा मुलगा अब्दुल कुद्दुस यांचे निधन झाले आहे. अब्दुल यांनी कॅनडातच अखेरचा श्वास घेतला. मात्र त्यांच्या मृत्यूचे कारण अजून स्पष्ट झाले नाही.
अब्दुल कुद्दुस हे कॅनडात राहत होते. ते तेथील एअरपोर्टवर सिक्युरिटी ऑफिसर म्हणून कार्यरत होते. तर सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने अब्दुल यांच्या निधनाची पोस्ट त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केली आहे. या दरम्यान, ३१ डिसेंबर २०१८ रोजी वयाच्या ८१ व्या वर्षी अभिनेते कादर खान यांचेही कॅनडातच निधन झाले होते. तसेच, त्याच्या मुलांचेही (अब्दुल) कॅनडातच निधन झाले आहे.
दरम्यान, कादर खान यांना अब्दुल कुद्दुस यांच्याशिवाय अन्य दोन मुलं आहेत. यात अब्दुल कुद्दुस सर्वात मोठा होता. त्यांच्या अन्य २ मुलांची नावं सरफराज आणि शहनवाज खान अशी आहेत. सरफराज व शहनवाज दोघेही फिल्ममधेच आहेत. सरफराज अभिनेता व निर्माता आहे. कादर खान यांचा सर्वात धाकटा मुलगा शहनवाज हे दिग्दर्शन, एडिटींग व ग्राफिक डिझाईन क्षेत्रात कार्यरत आहे.