K. S. Sowmya Sathyanarayana | ‘सूर्यवंशम’ फेम अभिनेत्री सौंदर्याच्या अपघाती मृत्यूला वेगळं वळण, अपघात नव्हे तर हत्या; गुलदस्त्यातील गूढ उकळलं

मुंबई : K. S. Sowmya Sathyanarayana | अमिताभ बच्चन यांचा सूर्यवंशम हा सिनेमा २१ मे १९९९ मध्ये प्रदर्शित झाला होता. हा सिनेमा थिएटर्समध्ये फ्लॉप ठरला मात्र टेलिव्हिजनवर चांगलाच यशस्वी ठरला. यातील अभिनेत्री सौंदर्या (सौम्या सत्यनारायण) यांनी साकारलेली भूमिका सुपरहिट ठरली होती. १७ एप्रिल २००४ ला सौंदर्या यांचे वयाच्या ३१ व्या वर्षी विमान अपघातात निधन झाले. पण आता २२ वर्षांनी तिच्या मृत्यूबाबत नवीन खुलासा समोर आला आहे.

सौंदर्या यांचा मृत्यू झाला तेव्हा त्या गर्भवती होत्या असा दावा केला जातोय. याप्रकरणी टॉलीवूड्चे ज्येष्ठ अभिनेते मोहन बाबू यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यांच्यावर सौंदर्याच्या मृत्यूमध्ये सहभागी असल्याचा आरोप करण्यात आला आहे. सौंदर्याचा मृत्यू अपघाताने नाही तर तिचा खून करण्यात आल्याचा आरोप आहे.

सौंदर्या १७ एप्रिल २००४ ला करीमनगरमध्ये भारतीय जनता पक्ष आणि तेलुगू देसम पक्षाच्या राजकीय प्रचार कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जात होती. त्यावेळी त्यांचा आणि त्यांच्या भावाचा विमान अपघातात मृत्यू झाला. अपघातानंतर सौंदर्याचा मृतदेहही सापडला नव्हता. त्यानंतर आता तब्बल २२ वर्षांनी तक्रार दाखल करण्यात आली आहे.

माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, मोहन बाबुसोबतच्या मालमत्तेच्या वादातून सौंदर्याचा खून करण्यात आला आहे. मोहन बाबू यांनी भावंडांवर जमीन विकण्यासाठी दबाव आणला होता. तर विमान अपघातानंतर त्यांनी बेकायदेशीरपणे जमीन बळकावल्याचा आरोपही तक्रार करणारा व्यक्ती चित्तमुल्ला याने केला आहे. मोहन बाबूमुळे जीवाला धोका असून पोलीस संरक्षणाची मागणी त्याने केली आहे.

सौंदर्या अभिनेत्रीबाबत:

सौंदर्या यांचे खरं नाव सौम्या सत्यनारायण असे होते. त्या कन्नड अभिनेत्री होत्या पण त्यांचे तामिळ आणि तेलगू भाषांवरही प्रभुत्व होते. त्यांनी ‘एमबीबीएस’चे शिक्षण घेतले होते. १९९९ मध्ये सूर्यवंशम सिनेमातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. अवघ्या १२ वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी १०० हुन अधिक सिनेमांमध्ये काम केले. त्या काळातील कदाचित एकमेव अभिनेत्री होत्या ज्यांनी तामिळ, तेलुगू, कन्नड, हिंदी आणि मल्याळम या पाच भाषांमध्ये सिनेमे केले होते. त्यांनी जीएस रघुबरोबर लग्न पण लग्नाच्या वर्षभरातच त्यांचा मृत्यू झाला.