नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेचा तिढा सुटत नसताना दुसरीकडे मध्य प्रदेशातील राजकारणात खळबळ उडाली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव ज्योतिरादित्य सिंधिया यांनी त्यांच्या ट्विटरवरून काँग्रेस पक्षाचे नाव व आपले पद हटविले आहे.दरम्यान, मध्य प्रदेशातील मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या कामकाजासंदर्भातील असलेल्या नाराजीमुळे ज्योतिरादित्य सिंधिया यांनी हे पाऊल उचलल्याची माहिती मिळाली आहे.
https://twitter.com/jm_scindia?lang=en
दरम्यान, ज्योतिरादित्य यांनी वारंवार मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या कामकाजाबाबत नाराजीचे पत्र सरकारला दिले होते.ऑक्टोबर मध्येही सरकारला तब्बल ४ पत्रे लिहिली होती. या पत्रांत शेतकऱ्यांना मदत, पूरपरिस्थितीसीठी मदत, रस्त्यांची परिस्थिती अशा गोष्टींवर काम करण्याची मागणी केली होती. मात्र, त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जात होते. त्यानंतर आता ज्योतिरादित्य यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव हे पद काढून टाकले असून त्या ठिकाणी समाजसेवक व क्रिकेटप्रेमी असे लिहिले आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे आता अनेक चर्चांना उधाण आले आहे.
Visit : bahujannama.com