पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Jyotiba Phule Jayanti – Chandrakant Patil | राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महात्मा जोतिराव फुले जयंतीनिमित्त फुलेवाडा (Phule Wada) येथे सकाळी थोर समाजसुधारक क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. (Jyotiba Phule Jayanti – Chandrakant Patil)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
यावेळी माजी आमदार दिपक पायगुडे (Deepak Paigude), बाळासाहेब आमराळे (Balasaheb Amrale), हेमंत रासने (Hemant Rasane), गणेश बिडकर (Ganesh Bidkar) आदी उपस्थित होते.
पालकमंत्री पाटील यांनी महात्मा फुले यांच्या निवास्थानी असलेल्या प्रतिमेलाही पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर त्यांनी महात्मा फुले यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या १ लाख नागरिकांसाठी मास्टर शेफ विष्णू मनोहर (Master Shape Vishnu Manohar) यांच्या हस्ते मिसळ बनविण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ केला.
पालकमंत्री पाटील यांनी भिडेवाडा (Bhide Wada) येथेही भेट देऊन महात्मा जोतिराव फुले यांच्या प्रतिमेला वंदन केले.
Web Title :- Jyotiba Phule Jayanti – Chandrakant Patil | Guardian Minister Chandrakant Patil’s greetings to Mahatma Jotirao Phule on his birth anniversary
हे देखील वाचा :
PM Kisan | १४व्या हप्त्याची मोठी अपडेट! या महिन्यात येऊ शकतात पैसे, तयार ठेवा हे डॉक्यूमेंट