मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – 5G नेटवर्कला विरोध करणारी एक याचिका अभिनेत्री जूही चावलाने (Juhi Chawla) दिल्ली हायकोर्टात (Delhi High Court) दाखल केली होती. दिल्ली हायकोर्टाने जूही चावलाची (Juhi Chawla) ही याचिका फेटाळून लावत 20 लाखांचा दंड ठोठावला. यावरून आता जूही चावलाने समाज माध्यमांवर (Social media) एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये तिने स्वतःचं मत मांडत प्रतिक्रिया दिली आहे. जुहीने शेअर केलेला व्हिडिओ समाज माध्यमावर (Social media) प्रसारित (Viral) होताना दिसतोय.
https://twitter.com/iam_juhi/status/1402531320073375747
बॉलिवूड अभिनेत्री जुही चावलाने (Juhi Chawla) शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, की,
नमस्कार काही दिवसामध्ये गोंधळ एवढा वाढला आहे की,
मी स्वत:चा आवाजही ऐकू शकले नाही.
याच गोंधळामध्ये मला वाटलं की एक अतिशय महत्त्वाचा मेसेज (Message) कदाचित विसरले आहे.
तो महत्वाचा मेसेज म्हणजे, आम्ही 5G नेटवर्क विरोधात नाही.
उलट आम्ही याचे स्वागत करीत आहोत. तुम्ही ते नक्की आणा.
आम्ही केवळ इतकंच बोलत होतो की, 5G नेटवर्क सुरक्षित आहे हे अधिकाऱ्यांनी स्पष्ट करावे.
असं जुही चावलाने आपल्या व्हायरल व्हिडिओ मध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, तसेच, पुढे जुही चावलाने (Juhi Chawla) त्या व्हिडिओ मध्ये म्हटलं आहे की, ‘आमचं सांगणं फक्त एवढंच आहे की, या नेटवर्कबाबत तुमचा अभ्यास, संशोधन सार्वजनिक करा, जेणेकरुन आमच्या मनात जी भीती आहे, ती निघून जाईल. आम्ही सर्व निर्धास्तपणे झोपू शकतो. आम्हाला फक्त एवढंच जाणून घ्यायचे आहे की, ही टेक्नॉलॉजी (5g network) लहान मुले, गर्भवती महिला आणि जन्माला येणाऱ्या बाळांसाठी सुरक्षित आहे. असं न्यायालयाने फटकारल्या नंतर जुही चवलाने व्हिडिओ शेअर करत स्वतः मत मांडलं आहे.
कृपया हे देखील वाचा:
गुन्हे शाखेकडून तडीपार गुंड शफ्या खानला येरवडा गावठाण परिसरातून अटक; शफिकवर 13 गंभीर गुन्ह्यांची नोंद
कोंढव्यात भाजी विक्रेत्याच्या गालावर चाकूने वार
औरंगाबादमध्ये वीज कोसळून युवतीचा दुर्देवी मृत्यू, 1 जण गंभीर जखमी