Jug Jug Jeeyo : नीतू कपूर, वरुण धवन आणि डायरेक्टर ‘कोरोना’ पॉझिटिव्ह ? अनिल कपूर आणि कियारा अडवाणीचा रिपोर्ट ‘निगेटिव्ह’ !
बहुजननामा ऑनलाइन टीम – जुग जुग जियो (Jug Jug Jeeyo) सिनेमाच्या सेटवरून मोठी बातमी समोर आली आहे. चंदीगढमध्ये शूटिंग करणाऱ्या सिनेमाच्या टीममधील काही खास लोकांना कोरोना झाल्याची माहिती आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिनेमातील लिड वरुण धवन (Varun Dhawan) आणि नीतू कपूर (Neetu Kapoor) यांना कोरोनाची लागण झाली आहे. अनिल कपूर (Anil Kapoor) आणि कियारा अडवाणी (Kiara Advani) यांच्या चाहत्यांसाठी दिलासादायक बातमी आहे की, त्यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे.
एका सेलिब्रिटी फोटोग्राफरनं त्याच्या अकाउंटवरून पोस्ट शेअर करत सांगितलं आहे की, जुग जुग जियो सनेमातील लिडिंग अॅक्टर्सला कोरोना झाला आहे. या माहितीनुसार अनिल कपूर आणि कियारा अडवाणी यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.
https://www.instagram.com/p/CIXqQixnCAQ/?utm_source=ig_embed
एका रिपोर्टनुसार, नीतू कपूर, वरुण धवन आणि डायरेक्टर राज मेहता यांना कोरोनाची लागण झाली आहे. अलीकडेच या सर्वांनी जुग जुग जियो सिनेमाची शूटिंग सुरू केली होती.
परंतु अद्याप मेकर्स किंवा खुद्द स्टार्सनी याची पुष्टी केलेली नाही. अशात आम्हीही काही पुष्टी करू शकत नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, कलाकारांना कोरोना झाल्यानंतर सिनेमाची शूटिंग थांबवण्यात आली आहे.
Comments are closed.