नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्षपदी जगत प्रकाश नड्डा यांची बिनविरोध निवड झाली आहे. भाजपाच्या राष्ट्रीय निवडणूक समितीचे प्रमुख राधामोहन सिंग यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली. भाजपचे अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पक्षाचे निवडणूक प्रभारी राधामोहन सिंह यांना नड्डांचे नाव सुचवले होते. शहा यांनी गृहमंत्रीपद स्वीकारल्यानंतर नड्डा भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होते. लोप्रोफाइल, आणि वादग्रस्त ववक्तव्यांपासून दूर राहणारे प्रभावी नेते, अशी त्यांची प्रतिमा आहे. भाजपाच्या राष्ट्रीय राजकारणात त्यांचे वजन आहे. नड्डा यांची राजकीय कारकीर्द कशी आहे ते जाणून घेवूयात.
अशी आहे माहिती
नाव – जगत प्रकाश नड्डा
गाव – हिमाचल प्रदेश
जन्म – 2 डिसेंबर 1960 ला बिहारमधील पाटणामध्ये झाला.
शिक्षण – बीए. एलएलबी. शालेय ते बीएपर्यंतचे शिक्षण बिहारमध्ये तर हिमाचलमध्ये एलएलबीचे शिक्षण घेतले.
राजकीय कारकिर्द – महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय विद्यार्थी परीषदेत दाखल झाले. यानंतर 1993मध्ये पहिल्यांदा ते हिमाचल प्रदेशमधून आमदार म्हणून निवडूण आले.
तीन वेळा आमदार
एबीव्हीपीनंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. ते तीन वेळा भाजपच्या तिकीटावर हिमाचल प्रदेशातून आमदार झाले. 1993 ते 98, 1998 ते 2003 आणि 2007 ते 2012 पर्यंत ते आमदार होते. 1994 ते 98 दरम्यान ते हिमाचल प्रदेश भाजपच्या विधिमंडळाचे नेते होते.
धूमल मंत्रिमडळात आरोग्यमंत्री
2008 मध्ये प्रेम कुमार धूमल सरकारमध्ये ते आरोग्य मंत्री होते. यानंतर त्यांचा राजकीय प्रगतीचा आलेख उंचावत गेला.
2010 मध्ये राष्ट्रीय राजकारणात
नितिन गडकरी भाजपाचे अध्यक्ष असताना जे. पी. नड्डा यांनी 2010 मध्ये राष्ट्रीय राजकारणात दाखल झाले. तत्कालीन अध्यक्ष गडकरी यांनी त्यांना सरचिटणीस पद दिले होते. यानंतर पक्षाच्या राष्ट्रीय पातळीवर त्यांचे वलय वाढू लागले. 2014मध्ये नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान होताच नड्डा यांना कॅबिनेट मंत्री केले.
भाजपचे कार्यकारी अध्यक्ष
2019 मध्ये केंद्रात पुन्हा मोदी सरकार आल्यावर त्यांना आरोग्यमंत्री करण्यात आले. तर अमित शहा गृहमंत्री झाले. परंतु, पक्षाध्यक्ष पदाचे काम कसे करायचे हा शहा यांच्या समोर प्रश्न असल्याने ती जबाबदारी नड्डा यांच्यावर सोपवण्यात आली. नड्डा यांनी जुलै 2019 मध्ये आरोग्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि ते भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष झाले.
उत्तर प्रदेशात सत्ता आल्याने वाढले वजन
2019 च्या लोकसभा निवडणुकीत नड्डा यांच्यावर उत्तर प्रदेशची जबाबदारी सोपवण्यात आली होती. उत्तर प्रदेशमध्ये जास्तीत जास्त जागा जिंकणे आवश्यक होते, नड्डा यांच्या प्रयत्नामुळे पक्षाला 62 जागा मिळाल्या. यामुळे नड्डांचे पक्षातील वजन आणखी वाढले. या निवडणुकीत सपा-बसपाने युती करून भाजपाला रोखण्यासाठी पूर्ण ताकद लावली होती. परंतु, नड्डा यांनी अचूक नियोजन आणि धोरणे आखून या युतीचा पराभव केला.