सोलापूर : बहुजननामा ऑनलाईन – फेसबुक लाईव्ह करुन पंढरपुरातील एका पत्रकाराने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.अभिराज उबाळे असे या पत्रकाराचे नाव असून फेसबुक लाईव्ह केल्यानंतर त्यांनी विषारी औषध प्राशन केले आहे. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
अभिराज उबाळे यांनी फेसबुक लाईव्हमध्ये आपल्यावर होणाऱ्या अन्यायाची व्यथा मांडली आहे. पंढरपुरातील नेते उमेश परिचारक, पंढरपूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांच्यासह अनेक जण गेल्या काही दिवसांपासून आपल्याला जीवे मारण्याची धमकी देत आहेत तसेच त्रास देत असल्याचा आरोप अभिराज यांनी केला आहे.
मला मरू द्या, दवाखान्यात नेऊ नका !
अभिराज उबाळे हे आत्महत्या करत असल्याचे समजताच काही मित्रांनी आणि पत्रकारांनी त्या ठिकाणी धाव घेतली. उबाळे यांना उपचारासाठी दवाखान्यात घेऊन जात होते. त्यावेळी अभिराज जोरजोरात ओरडत म्हणत होते की , मला मला मरू द्या ,दवाखान्यात नेऊ नका असे.