पुणे बहुजननामा ऑनलाईन – तुम्ही १० वी पास आहात? त्यासोबतच तुमच्याकडे सर्वेअर, किंवा सब ओव्हरसीय़र चे प्रमाणपत्र आहे. तर त्वरीत अर्ज करा. पुणे महापालिकेत सहायक अतिक्रमण निरीक्षक पदाच्या ४५ जागांची भरती सुरु झाली आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ जूलै आहे.
पदाचं नाव – सहायक अतिक्रमण निरीक्षक
शैक्षणिक पात्रता – इयत्ता १० वी उत्तीर्ण, सर्वेयर किंवा सब ओहरसीयर कोर्स
वयाची अट – १८ जूलै रोजी १८ ते ३८ वर्षांपर्यंत तर मागासवर्गीयांना ५ वर्षांची सूट
पदसंख्या – ४५, यात अनुसुचित जातींची ६ तर अनुसुचित जमातीची ३ पदं. तर एसईबीसी ची ७ पदं आहेत.
अर्ज येथे करा – अतिक्रमण/अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभाग, महानगरपालिका भवन,खोली क्र.119, पहिला मजला, शिवाजीनगर, पुणे-411005
अस्थायी स्वरुपात हे पद भरण्यात येणार आहे. त्यात पात्रता आणि अनुभव याचा विचार करून गुणानुक्रमे निवड व प्रतिक्षा यादी तयार करण्यात येणार आहे. सहा महिने कालावधीसाठी हे पद भरण्यात येणार आहे.