Jitendra Awhad | कायद्याचा दुरूपयोग झाल्यास कायदा हाती घेणार – जितेंद्र आव्हाड.
मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र (Jitendra Awhad) आव्हाड यांनी नुकतेच एक ट्वीट केले होते त्यात त्यांनी औरंगजेब हा धर्मद्वेष्टा नव्हता. असा उल्लेख केला होता. त्यावर विविध मराठा संघटनांनी तसेच सत्ताधारी भाजपने त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यातच आता त्यांचा आता एक नवीन व्हिडिओ समोर येत आहे. ज्यात त्यांनी हातात भगवदगीता व कुराण घेतले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, जो गुन्हा मी केलाच नाही त्याची शिक्षा मी का भोगू? असा सवाल करत त्यांच्याविरूध्द बलात्काराच्या गुन्ह्याचा कट रचला गेल्याचे ते (Jitendra Awhad) म्हणाले. त्याचबरोबर जर कायद्याचा दुरूपयोग होणार असेल तर मी ही कायदा हातात घ्यायला तयार आहे. असा इशारा देखील यावेळी त्यांनी विद्यमान सरकारला नाव न घेता दिला.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
जितेंद्र आव्हाड(Jitendra Awhad) म्हणाले, ज्या महिलेने माझ्यावर ३५४ चा गुन्हा दाखल केला ती खुलेआम फिरत आहे. पोलीस देखील या महिलेवर कोणतीही कारवाई करत नाहीत. जर पोलिसांना याबाबत विचारलं तर वरून दबाव असल्याचे उत्तर ते देत आहेत. आता या सर्वांनी एक नवीन षडयंत्र माझ्याविरूध्द रचलं आहे. माझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत आणि हे प्रयत्न ज्यांनी विनयभंगाचा माझ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी केले तेच करत असल्याचे समोर आला आहे.
तसेच या व्हिडिओमध्ये पुढे बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, ३५४ चा गुन्हा मी कधीही खपवून घेणार नाही. माझ्यावर कोणताही गुन्हा दाखल केला असता तरी चाललं असते. परंतु जे कृत्य मी केलं नाही त्याची शिक्षा देखील मी भोगणार नाही. आज हातामध्ये गीता आणि कुराण सोबत घेऊन मी सर्व माझ्या मतदारांना सांगत आहे. जी महिला सध्या फिरत आहे. तिला कसलीही भीती नाही पोलीस तिला अटक करत नाहीत. त्यामुळे पोलीस जे करू शकत नाही ते तर माझ्या हातून घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा इशारा देखील जितेंद्र आव्हाड यांनी या व्हिडिओमध्ये दिला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
काही दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्याविरूध्द त्यांचा मतदारसंघ असलेल्या मुंब्रा येथील कार्यकर्त्यांनी मुंब्रा-कळवा परिसरात जोरदार आंदोलन केले होते.
आव्हाडांनी आमदारकीचा राजीनामा देण्याची देखील घोषणा केली होती.
जितेंद्र आव्हाड यांच्यावर करण्यात आलेला आरोप हा राजकीय सुडबुध्दीने करण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला होता.
जितेंद्र आव्हाड यांनी कोणताही गुन्हा केला नसल्याचे सांगतानाच त्यांना त्यांना जाणून बुजून या प्रकरणात
गोवण्यात आल्याचा दावा करत जितेंद्र आव्हाडांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनी कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
Web Title :- Jitendra Awhad | conspiracy to file rape case against me says jitendra awhad
हे देखील वाचा :
Sanjay Raut | शिंदे सरकारच्या भवितव्याबद्दल संजय राऊतांचे मोठे विधान; म्हणाले, ‘हे तर…’
Comments are closed.