नवी दिल्ली : वृत्तसंस्था- रिलायंस जिओने आपला मोस्ट अवेटेड जिओ फायबर ब्रॉडबँड सर्व्हिस प्लॅनची घोषणा केली आहे. कंपनीने देशातल्या 1600 शहरांमध्ये ही सर्व्हिस लाँच केली आहे. कंपनीने वक्तव्य केलं आहे की, जिओ फायबर भारतातील पहिली 100 % ऑल फायबर ब्रॉडबँड सर्व्हिस आहे. याचा सुरुवातीचा स्पीड 100 MBPS असेल आणि हा स्पीड 1 GBPS पर्यंत असणार आहे.
जिओ फायबरमध्ये काय काय मिळणार ?
1) अल्ट्रा हाय स्पीड ब्रॉडबँड
2) फ्री डोमेस्टीक व्हाईस कॉलिंग, काँफ्रेंसिंग आणि इंटरनॅशनल कॉलिंग
3) टीव्ही व्हिडीओ कॉलिंग
4) गेमिंग
जिओ फायबरचा मंथली प्लॅन 699 रुपयांनी सुरु होऊन 8499 रुपयांपर्यंत असेल
1) सर्व प्लॅन्सचा स्पीड 100MBPS ने सुरु होईल.
2) तुम्ही जास्तीत जास्त 1GBPS स्पीड मिळवू शकता.
दीर्घकालीन प्लॅन
1) जिओ फायबरच्या युजर्ससाठी 3,6 आणि 12 महिन्यांचा प्लॅन उपलब्ध असेल.
2) बँक टायअपच्या माध्यमातून जिओ आकर्षक EMI प्लॅन देणार आहे. यात ग्राहकांना ईएमआय अदा करून वार्षिक प्लॅनचा लाभ मिळणार आहे.
Reliance Industries Limited च्या AGM दरम्यान Jio Forever Plan नुसार कंपनीने एचडी किंवा 4K एलईडी टीव्ही देण्याचीही घोषणा केली आहे.
प्रिव्ह्यु ऑफरची व्हॅलिडीटी
सध्याचे जिओ फायबरचे युजर्स पेड प्लॅनमध्ये ट्रान्सफर केले जातील. यासाठी त्यांना कंपनीसोबत संवाद साधावा लागणार आहे. तत्पू्र्वी ते सर्व्हिस युज करत राहतील.