बहुजननामा ऑनलाइन – आज स्पर्धेत टिकून रहाण्याकरीता टेलिकॉम कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन प्लॅन घेऊन येत असतात. अनलिमिटेड कॉल , डेटा , मोफत एसएमएस सारखे प्लॅन आणून आपल्या ग्राहकांना नेहमी जोडून ठेवण्याचे काम कंपन्या करत असतात. तुम्ही जर प्रीपेड यूजर आहात , तर जिओ , एरटेल आणि वोडाफोन सारख्या कंपन्यांचे हे प्लॅन तुम्हाला फायदेशीर आहेत. ज्यात तुम्हाला ३०० रुपयांच्या आत असणाऱ्या टॉप प्लॅन संदर्भात माहिती आहे , ज्यात जास्तीत जास्त इंटरनेट डेटा तसेच अनलिमिटेड कॉलिंग देखील उपलब्ध आहे.
चला तर मग जाणून घेऊया , या प्लॅन विषयी ..
* रिलायन्स जिओ चा २९९ रुपयांचा प्रीपेड प्लॅन :
रिलायन्स जिओ हि भारतातील अग्रगण्य टेलिकॉम कंपनी आहे. थोड्याच कालावधीत सर्व कंपन्यांना तोड देत, जास्त सब्सक्राइबर्स मिळवत आपली लोकप्रियता वाढवली आहे. जिओच्या इतर प्लॅन प्रमाणे देखील २९९ रुपयांचा हा टॉप प्लॅन आहे, यात तुम्हाला रोज ३ जीबी देता वापरण्यास मिळतो, तसेच अनलिमिटेड लोकल, STD कॉलिंग, तसेच रोज १०० SMS असणाऱ्या ह्या प्लॅनची व्हॅलिडिटी २८ दिवसांची आहे. याचबरोबर ग्राहकांना जिओ च्या ऍप साठी मोफत सबक्रिप्शन देखील मिळणार आहे. ज्याद्व्यारे आपण जिओ सिनेमा , जिओ न्यूज सारख्या ऍप चा आनंद घेऊ शकतो.
* एरटेल चा २९९ रुपयांचा प्लॅन.
एरटेल च्या २९९ रुपयांच्या प्लॅन संदर्भात सांगायचे झाले तर, त्यात तुम्हाला रोज २. ५ जीबी देता वापरण्यास मिळतो. या प्लॅनची व्हॅलिडिटी २८ दिवसांची आहे ज्यात अनलिमिटेड लोकल , STD कॉल्स तसेच रोज १०० SMS ची सुविधा उपलब्ध होते. एरटेल च्या प्लॅन सोबत आपल्याला एमेझॉन प्राईम मेम्बरशिप , एरटेल टीव्ही प्रीमियम , विंक म्युझिक सबक्रिप्शन तसेच १ वर्षासाठी नॉर्टन मोबाईल सिक्योरिटी सब्सक्रिप्शन आणि महत्वाचे म्हणजे नवीन ४ जी मोबाईल घेतल्यास २००० रुपये कॅशबॅक देखील मिळते.
* वोडाफोन चा २५५ रुपयांचा प्रीपेड प्लॅन :
वोडाफोन च्या या २५५ रुपयांच्या या प्लॅन मध्ये नुकतेच काही बदल करण्यात आले आहे. आत या प्लॅन मध्ये तुम्हाला रोज २. ५ जीबी ३ जी /४जी डेटा वापरण्यास मिळतो. यात तुम्हाला अनलिमिटेड लोकल , STD कॉल्स आणि रोमिंग कॉल्स ची देखील सुविधा उपलब्ध होते. सोबतच रोज १०० SMS सुद्धा मिळणार आहेत. २५५ रुपयांच्या या प्लॅन मध्ये तुम्हाला लाईव्ह टीव्ही, म्युझिक आणि वोडाफोन ऍप चे ऍक्सेस देखील मिळतो.