बहुजननामा ऑनलाईन – jio कंपनीने ग्राहकांसाठी स्वस्त अशी नवी ऑफर आणली आहे. कंपनीकडून 98 रुपयांपासून 600 रुपयांपर्यंत बंपर ऑफर Prepaid धारक ग्राहकांना देण्यात येत आहे. ग्राहकांना अवघ्या 98 रुपयांमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि इंटरनेटची सुविधा दिली आहे.
jio ही Vodafone-idea, Airtel ची प्रतिस्पर्धी आहे. Jio लाँच झाल्यानंतर कॉलिंग, इंटरनेटचे दर कमी झाले. वोडाफोनला टक्कर देण्यासाठी आता जिओने 98 रुपयांचा प्लान लाँच केला आहे.
jio 98 Prepaid Plan
ग्राहकांसाठी jio कंपनीने या प्लॅनची किंमत शंभर रूपयांपेक्षा कमी ठेवली आहे. यात 28 दिवसांची व्हॅलिडिटी आणि 28 दिवसांसाठी ग्राहकांना 2 GB डेटा देण्यात आला आहे. तसेच 300 SMS आणि जिओ ते जिओ अनलिमिडेट कॉलिंग फ्री आहे. इतर नेटवर्कसाठी 124 मिनिटे आहेत. जिओ अॅपचाही मोफत लाभ मिळू शकतो. पूर्वी जिओ दरदिवशी दोन जीबी डेटा या प्लॅनमध्ये देत होती.
jio vs vodafone plan
या दोन्ही कंपन्यांनी शंभर रुपयांपेक्षा कमी प्लॅन सादर करून ग्राहकांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला आहे. आता ग्राहकांना आपल्या वापरानुसार यातील योग्य कंपनीचा योग्य प्लॅन निवडता येईल. नेटचा जास्त वापर असल्यास जिओ आणि कॉल चा जास्त वापर असल्यास वोडाफोन फायद्याचे ठरू शकते.
असे आहेत दोन प्लॅन
वोडाफोन-आयडिया कंपनीचा हा प्लॅनही शंभर रूपयांपेक्षा कमी आहे. यात 18 दिवसांची व्हॅलिडिटी आणि 18 दिवसांसाठी 1 GB डेटा, रोज 100 SMS आणि अनलिमिडेट कॉलिंग फ्री आहे. वोडाफोन प्लेसाठी कॉम्प्लिमेंट्री सब्सक्रिप्शनसह 999 रुपयांमध्ये ZEE 5 अॅपसाठी सब्सक्रिप्शन आहे.
Visit : Bahujannama facebook page –
- ‘अॅपल टी’चे हे 4 फायेद वाचून व्हाल थक्क! जाणून घ्या ‘रेसिपी’
- संधिवाताची ‘ही’ आहेत 10 लक्षणे आणि 11 कारणे, जाणून घ्या महत्वाच्या गोष्टी
- रंग आणि आरोग्याचे ‘कनेक्शन’ ! जाणून घ्या ‘या’ 10 रंगांचे तुमच्यावरील परिणाम
- ‘या’ 6 पद्धतीने करा तुमच्या आयुष्यातून तणावाला हद्दपार
- ‘विराट’ आणि ‘सेरेना’नेही केला होता फॉलो, ‘वेगन डाएट’चे हे 6 फायदे जाणून घ्या
- झोपल्यावर घाम येत असल्यास ‘या’ 9 कारणांचा विचार करा