बहुजननामा ऑनलाईन टीम : दूरसंचार कंपन्यांच्या नवीन नियमांचा ग्राहकांना चांगलाच फटका बसला आहे. त्यात आता रिलायन्स जिओ फायबरच्या युजर्संनादेखील आता फ्री ब्रॉडबॅंड सेवा मिळणार असून कंपनीनं नवीन युजर्सकडून ब्रॉडबॅंड सेवेसाठी शुल्क आकरण्यास सुरुवात केली आहे. सोबतच कपंनीने जुन्या ग्राहकांना देखील ब्रॉडबॅंड सेवेसाठी रिचार्ज करण्याच्या सुचना पाठवण्यास सुरुवात केली आहे. अधिक नफा कमवण्याच्या उद्देशानं कंपनीकडून हे पाऊल उचललण्यात आलं आहे. देशात जिओ फायबर वापरणाऱ्या ग्राहकांची संख्या जास्त असून त्यांच्याकडून २५०० रुपयांची अमानत रक्कम जमा केली होती. असं असून देखील त्यांच्याकडून आता अधिकचे सर्व्हिस म्हणजेच सेवा शुल्क आकारण्यात येत आहे. तसेच मिळालेल्या माहितीनुसार येणाऱ्या काही दिवसांत देशभरात जिओ फायबरच्या युजर्ससाठी व्यावसायिक बिलिंग सुरू होणार आहे.
पाच लाख ग्राहकांना टॅरिफ प्लॅनवर करणार शिफ्ट :
जिओ फायबर बाजारात अधिकृतपणे लॉन्च होण्यापूर्वी पाच लाख फायबरच्या ट्रायल ग्राहकांनी ही सेवा सब्सक्राइब केली होती. त्या ग्राहकांना आता टॅरिफ प्लॅनवर शिफ्ट करण्यात येणार आहे.’ फ्री ब्रॉडबॅंड सेवा लवकरच बंद होणार असून या सेवेचे लाभ घेण्यासाठी जिओ फायबरच्या प्लॅन्सला सब्सक्राइब करा’ अशी सुचना कंपनीकडून ग्राहकांना देण्यात येत आहे. ही प्रकिया पुढच्या एक महिन्यात पूर्ण करण्यात येणार आहे.
सर्वात स्वस्त प्लॅन ६९९ रुपयांचा :
जिओ फायबरच्या टॅरिफ प्लॅनची सुरुवात ६९९ पासून सुरु होते असून हा सर्वात स्वस्त प्लॅन असल्याचे समजते. तर सर्वात महाग प्लॅन हा ८,४९९ रुपयांचा आहे. या प्लॅन्सच्या माध्यमातून युजर्संना १०० mbps ते १ Gbps पर्यंतची इंटरनेट स्पीड मिळणार आहे. प्लॅनमध्ये गेमिंग, होम नेटवर्क शेअरिंग, टीव्ही विडियो कॉलिग आणि कॉन्फ्रेसिंगसोबतच डिवाइस सिक्यॉरिटी, ओटीटी कॉन्टेंट इत्यादी प्लॅटफॉर्मचा अॅक्सेस देण्यात आला आहे.
ग्लोबल रेटिंग कंपनीचे Fitchचे कॉर्पोरेट संचालक नितिन सोनी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘जिओ फायबर लॉन्च होण्यापूर्वी कंपनीला आपल्या ग्राहकांकडून मोठ्या अपेक्षा होत्या, परंतु लॉन्चनंतर जिओ फायबरला ग्राहकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. कारण जिओ फायबरच्या योजना या परवडण्याजोग्या नसल्याचे समजते. त्यामुळं आता अधिक नफा मिळवण्याच्या दृष्टीनं जिओ फायबरची फ्री सेवा बंद करण्यात आली आहे.
Visit : bahujannama.com