नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रिलायन्स जिओने त्यांच्या प्रीपेड ग्राहकांसाठी दोन नवीन प्लॅन सादर केले असून हे दोनही प्लॅन शॉर्ट टर्म व्हॅलिडिटी असणारे आहेत. दोन्ही प्रीपेड प्लॅन्सअंतर्गत चौदा दिवसांचा कालवधी मिळेल. याशिवाय व्हॉइस कॉलिंग, डेटा आणि एसएमएसही मिळणार आहेत. ६९ रुपय्याच्या प्लॅनमध्ये ०.५ जीबी हाय डेटा रोज मिळतो. डेटा लिमिट संपल्यावर तुम्हाला ६४केबीपीएस स्पीड मिळते. तसेच या प्लॅनमध्ये तुम्ही जिओ ते जिओ अनलिमिटेड कॉलिंग करू शकता.
६९ रुपयाच्या प्लॅनमध्ये जिओने नॉन जिओ नेटवर्कला कॉल करण्यासाठी २५० मिनिट दिले जातील. याशिवाय यात २५ एसएमएस आणि जिओ ऍप्सचे ऍक्सेसही दिले जाणार असून या प्लॅनची व्हॅलिडिटी १४ दिवसांची आहे. ४९ रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला २ जीबी डेटा मिळणार असून या योजनेत आपणास जिओकडून अनलिमिटेड कॉलिंग मिळेल. तसेच २५० मिनिटे नॉन जिओ कॉलिंग मिळेल.
४९ रुपयांच्या या प्रीपेड योजनेत १४ दिवसांची व्हॅलिडिटी मिळणार असून २५ एसएमएस मिळणार आहेत. या दोन्ही योजना फक्त जिओफोन वापरणाऱ्यांसाठीच आहेत. एका अहवालानुसार ४९ आणि ६९ रुपयांशिवाय १५३ रुपयांचा जिओ प्लॅनही आहे. याअंतर्गत दररोज १.५ जीबी डेटा मिळतो. या प्लॅनची वैधता २८ दिवस असून दररोज जिओ व १०० एसएमएस आणि अमर्यादित कॉलिंग दिले जाईल.