बहुजननामा ऑनलाईन – Jio नेहमीच आपल्या ग्राहकांसाठी चांगल्या ऑफर देत असते. ग्राहकांना डेटा देण्याविषयी असो अथवा त्यांच्या सुरक्षिततेबद्दल कंपनी नेहमीच लोकांना जागरूक करते. तथापि, कंपनीने सर्व प्रयत्न करूनही हॅकर्स वापरकर्त्यांना त्यांचा बळी बनवतात. आता Jio ने आपल्या सर्व ग्राहकांना सावध राहण्याचे सांगत एक संदेश पाठविला आहे आणि अशा कोणताही संशयास्पद संदेश आणि कॉलला उत्तर देऊ नका असे सांगितले आहे. कंपनीने असे म्हंटले आहे, की KYC/ विनामूल्य मोबाईल डेटा देणाऱ्या मॅसेज/ कॉलपासून सावध राहा आणि त्यास काहीच प्रतिसाद देऊ नका, कारण हॅकर्स तुमचे मोठे नुकसान करू शकतात.
Jio ने आपल्या ग्राहकांना दिलेल्या संदेशात असे लिहिले आहे, की ”फसवेगिरीच्या हेतूने पाठविलेल्या कोणत्याही संदेशापासून सावध राहा, ज्यात तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती/KYC तपशील अद्ययावत करण्यास सांगितले जाते किंवा विनामूल्य मोबाईल डेटा देण्याचे वचन दिले गेले असेल. अशा अज्ञात/ संशयास्पद नंबरवरून कॉल करणाऱ्यांना आपली वैयक्तिक माहिती कधीही देऊ नका. सुरक्षित राहा. टीम Jio.”
जर आपण अशा संदेशांना प्रतिसाद दिलात, तर हॅकर्स आपले नुकसान करू शकतात. वास्तविक, या संदेशांच्या मदतीने हॅकर्स आपल्याकडून आपली वैयक्तिक माहिती संकलित करू इच्छित आहेत. आपली वैयक्तिक माहिती मिळवून ते आपला डेटा चोरू शकतात आणि कदाचित आपले खाते रिक्त देखील करतील. म्हणून कंपनी सतत वापरकर्त्यांना अशा मॅसेजला प्रतिसाद देऊ नका, असे सांगत असते.
आपल्या मोबाईलवर DND कसे सक्रिय करावे
Jio आपल्या ग्राहकांना अशा बनावट मॅसेज आणि कॉलपासून सुटका करण्यासाठी डू नॉट डिशटर्ब सेवा देखील देते, जे सहजपणे सक्रिय केले जाऊ शकतात. ते सक्रिय करण्यासाठी, आपल्या My Jio अँपच्या डाव्या कोपऱ्यात चिन्हावर टॅप करून सेटिंग्जवर जावे लागेल. त्यानंतर DND पर्यायाची निवड करावी लागेल. त्यानंतर कंपनीकडून एक संदेश येईल आणि सात दिवसांच्या आत आपल्या नंबरवर DND सक्रिय होईल. याशिवाय तुम्ही कस्टमर केअरवर कॉल करून DND सक्रिय करू शकता.