नवी दिल्ली : रिलायन्सने ४२ व्या AGM इव्हेंटमध्ये संपूर्ण लक्ष जिओ फायबर सेवेवर केंद्रित केले, ज्यामध्ये ब्रॉडब्रँड सर्विस , सेट टॉप बॉक्स आणि लँडलाईन कनेक्शन समाविष्ट आहे. जिओ कंपनी नेहमी प्री पेड सेवेवर जास्त लक्ष केंद्रित करत असते. परंतु आता जिओ कंपनीने पोस्ट पेड सेवावर देखील तितकेच लक्ष केंद्रित केले आहे. दरम्यान त्यांनी या प्लॅन संदर्भात अधिक माहिती दिलेली नाही , पण काही मुद्दे अधोरेखित केले आहे.
कोणासाठी असेल हा पोस्ट पेड प्लॅन ? :
रिलायन्स AGM इव्हेंट मध्ये मुकेश अंबानी यांनी सांगितलेल्या प्रमाणे जिओ पोस्ट पेड प्लॅन हा जिओ फायबर यूजर्स साठी आहे. ज्यांना प्लैटिनम ग्रेड सेवा आणि प्रोडक्ट एक्सपीरियंस हवा आहे. याचाच अर्थ जे लोक जिओ फायबर वापरतील त्यांनाच हा जिओ पोस्ट पेड चा लाभ घेता येईल.
जिओ पोस्ट पेड प्लस मधील ऑफर्स :
जिओ पोस्ट पेड प्लस ही एक प्रीमियम सेवा आहे. वैयक्तिक अनुभव घेणाऱ्या ग्राहकांसाठी हि सेवा उपलब्ध आहे. इथे ‘प्लस ‘ या शब्दाचा उपयोग वैल्यू-ऐडेड बेनिफिट्स साठी उपयोग करण्यात आला आहे.
* पोस्ट पेड सेवेच्या अनुषंगाने जिओ चे प्रतिनिधी आपल्या घरी येतील आणि वापरात असलेल्या सेवेला पोस्ट पेड सेवेत पोर्ट करतील. सिम सेटअप सेवेचे काम ग्राहकांच्या घरीच करण्यात येईल.
* जिओ पोस्टपेड प्लस सेवेद्वारे आपल्याला सगळ्या डिवाइस कनेक्टिव्हिटीची सुविधा मिळणार आहे.
*शेअरिंग पोस्ट पेड प्लॅन द्वारे आपण कुटुंबातील दुसऱ्या सदस्याला देखील हा डेटा आपण शेअर करू शकतो.
* इंटरनॅशनल रोमिंग चा फायदा देखील आपल्याला मिळणार आहे.
* ही प्लॅन सेवा असणाऱ्या ग्राहकाला नवीन फोन घेतल्या वर देखील अनेक फायदे मिळणार आहेत.
* जिओ ने दिलेल्या माहितीनुसार आपल्याला सर्व बिले ही एकत्र येणार आहेत.
जिओ ने दिलेल्या माहितीनुसार हि सेवा ५ सप्टेंबर पासून उपलब्ध होणार आहे. या संबंधीची संपूर्ण माहिती जिओ ऍप वर तसेच जिओ च्या सांकेतिक स्थळावर देण्यात येईल.