नवी दिल्ली : जिओ कंपनी नेहमीच ग्राहकांचं लक्ष केंद्रित करत असते. जिओ फोन २ ला ग्राहकांनी योग्य प्रतिसाद न दर्शविल्याने कंपनीने पुन्हा जिओ १ वर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जिओ १ आता अधिक स्वस्त होणार असून त्यात नवनवीन फीचर्सचा समाविष्ट करण्यात आला आहे. जिओच्या सबस्क्रायबर्सची संख्या ५० कोटींवर पोहचवण्याचं टार्गेट कंपनीसमोर असल्याने कंपनीने या फोन ची किंमत कमी करणार असल्याचे सांगितले आहे.
जिओ फोन १ ची किंमत १५०० रुपये होती. त्या फोनसोबतच ४९ रुपयांचा नेट बॅलन्सही देण्यात आला होता. सुरुवातीला या फोनमुळे कंपनीला भरपूर नफा झाला होता. परंतु त्यांनतर कंपनीच्या शेअर्समध्ये २८ टक्के घसरण झाली होती. त्यामुळे नफा वाढविण्यासाठी कंपनीने हा जिओ १ फोन पुन्हा बाजारात आणण्याचा निर्णय घेतला आहे.
बाजारात येणाऱ्या या नवीन फीचर्स च्या जिओ १ मध्ये अनेक नवीन गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे. शेती , मनोरंजन , इंग्लिश संदर्भातील अॅप्सचा समावेश या फोन मध्ये करण्यात येणार आहे. जिओ २ ची किंमत जास्त असल्याने कंपनी तोट्यात आली होती , त्यामुळे या जिओ १ ची किंमत स्वस्त करण्यात येणार आहे.