नवी दिल्ली : वृत्तसंस्था- आजच रिलायंसने जिओफायबरची घोषणा झाली. कंपनीचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी जिओ फायबर घेणाऱ्या ग्राहकांना वेलकम ऑफर दिली आहे. या अंतर्गत अनेक फ्री बीज देण्याची घोषणा केली आहे. जिओ फायबरचा मंथली प्लॅन 699 रुपयांनी सुरु होत आहे. यात डेटा स्पीड 100 MBPS असेल. सर्वात महाग प्लॅन 8499 रुपयांचा असेल. याचा स्पीड 1 GBPS पर्यंत असणार आहे.
काय आहेत प्लॅन ?
1)699 रुपयांचा प्लॅन ब्राँझ प्लॅन असेल. यात 100gb+5gb डेटा एक्स्ट्रा मिळणार आहे.
2) सिल्व्हर प्लॅन हा 849 रुपयांचा असेल. यात तुम्हाला 100gb+5gb डेटा एक्स्ट्रा मिळणार आहे. यात डेटा स्पीड 100 MBPS असेल. यात युजर्सना फ्री व्हाईस कॉलिंग ऑल ओव्हर इंडिया, टीव्ही व्हिडीओ कॉलिंग आणि कॉन्फ्रंसिंग, होम नेटवर्किंग इत्यादी सेवा मिळणार आहेत.
3) गोल्ड प्लॅनमध्ये तुम्हाला 500 MBPS चा स्पीड मिळणार आहे. यात 500 जीबी+250 जीबी एक्स्ट्रा डेटा मिळणार आहे. याची किंमत 1299 रुपये आहे. यात फ्री व्हाईस कॉलिंग, सेट टॉप बॉक्स, व्हिडीओ कॉन्फ्रंसिंग इत्यादी सेवा मिळणार आहेत.
4) डायमंड प्लॅनमध्ये 1250जीबी+250 जीबी एक्स्ट्रा डेटा मिळणार आहे. याची किंमत 2499 रुपये असणार आहे. यात फ्री व्हाईस अँड व्हिडीओ कॉलिंग गेमिंग आणि होम नेटवर्किंग अशा सेवा मिळणार आहेत.
5) प्लॅटीनम प्लॅनमध्ये 1GBPS चा स्पीड असेल. याची किंमत 3999 रुपये असेल. यात 2500 जीबी डेटा मिळणार आहे.
6) सर्वात महागडा प्लॅन असेल तो म्हणजे टायटेनियम. यात 1GBPS चा स्पीड असेल. याशिवाय 5000 जीबी अनलिमिटेड डेटा मिळणार आहे.
दीर्घकालीन प्लॅन
1) जिओ फायबरच्या युजर्ससाठी 3,6 आणि 12 महिन्यांचा प्लॅन उपलब्ध असेल.
2) बँक टायअपच्या माध्यमातून जिओ आकर्षक EMI प्लॅन देणार आहे. यात ग्राहकांना ईएमआय अदा करून वार्षिक प्लॅनचा लाभ मिळणार आहे.
Reliance Industries Limited च्या AGM दरम्यान Jio Forever Plan नुसार कंपनीने एचडी किंवा 4K एलईडी टीव्ही देण्याचीही घोषणा केली आहे.
प्रिव्ह्यु ऑफरची व्हॅलिडीटी
सध्याचे जिओ फायबरचे युजर्स पेड प्लॅनमध्ये ट्रान्सफर केले जातील. यासाठी त्यांना कंपनीसोबत संवाद साधावा लागणार आहे. तत्पू्र्वी ते सर्व्हिस युज करत राहतील.