नवी दिल्ली : वृत्तसंस्था- रिलायंस जिओ फायबर ब्रॉडबँड सर्व्हिस प्लॅनची घोषणा झाली आहे. कंपनीने आधीच सांगितले आहे की, या प्लॅनची सुरुवात 700 रुपयांपासून 10000 रुपयांपर्यंत असणार आहे. कंपनीने दावा केला आहे की, 1600 शहरातून 15 मिलियन लोकांनी रिलायंस जिओफायबरसाठी रजिस्ट्रेशन केलं आहे. सध्या प्लॅनची सुरुवात 699 रुपयांनी होत आहे. सध्या जिओ फायबरचे सर्व प्लॅन हे प्रीपेड आहे. परंतु आगामी काळात मात्र पोस्टपेड प्लॅन लाँच करण्यात येतील असे कंपनीने म्हटलं आहे.
जिओ फायबरचा मंथली प्लॅन 699 रुपयांनी सुरु होऊन 8499 रुपयांपर्यंत असेल
1) सर्व प्लॅन्सचा स्पीड 100MBPS ने सुरु होईल.
2) तुम्ही जास्तीत जास्त 1GBPS स्पीड मिळवू शकता.
दीर्घकालीन प्लॅन
1) जिओ फायबरच्या युजर्ससाठी 3,6 आणि 12 महिन्यांचा प्लॅन उपलब्ध असेल.
2) बँक टायअपच्या माध्यमातून जिओ आकर्षक EMI प्लॅन देणार आहे. यात ग्राहकांना ईएमआय अदा करून वार्षिक प्लॅनचा लाभ मिळणार आहे.
Reliance Industries Limited च्या AGM दरम्यान Jio Forever Plan नुसार कंपनीने एचडी किंवा 4K एलईडी टीव्ही देण्याचीही घोषणा केली आहे.
प्रिव्ह्यु ऑफरची व्हॅलिडीटी
सध्याचे जिओ फायबरचे युजर्स पेड प्लॅनमध्ये ट्रान्सफर केले जातील. यासाठी त्यांना कंपनीसोबत संवाद साधावा लागणार आहे. तत्पू्र्वी ते सर्व्हिस युज करत राहतील.