लातूर : बहुजननामा ऑनलाइन – निलंगा नगर पालिकेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या जिजाऊ सृष्टी व वाचनालयाचे लोकार्पण व जिजाऊ सावित्री जन्मोत्सवानिमित्त मराठा सेवा संघाच्या वतीने विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
नगरपालिकेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या जिजाऊ सृष्टी व भव्य वाचनालयाचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री निलंगेकर यांच्या हस्ते थाटामाटात संपन्न झाला. यावेळी मराठा सेवा संघाच्या वतीने जमात-ए-इस्लामी हिंद संघटनेला समाजरत्न, जीवलग फाऊंडेशनला समाजभूषण, लक्ष करिअर अकादमीला करिअररत्न, महात्मा फुले बचतगटाला सहकाररत्न, निलंगा पोलीस ठाणे जनरक्षक, जयभारत विद्यालयास आदर्श शाळा, रवींद्र सोनटक्के, राम चवरे, दयानंद मठपती यांना अवयव दाता, डॉ. श्रीराम पेठकर यांना उत्कृष्ट प्राचार्य, डॉ. रामकृष्ण पाटील, डॉ. किरण बाहेती यांना आरोग्यरत्न, भाग्यश्री मुगळे व तेजस्विनी हलगरकर यांना उद्योगरत्न, शिवाजी कोरे, बालाजी बोडे जाधव यांना व्यवसायरत्न, आनंदवाडी ग्रामपंचायतीस आदर्श गाव पुरस्काराने पालकमंत्री निलंगेकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी सेवा संघाच्या वतीने पालकमंत्री निलंगेकर यांचा मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, पंचायत समितीचे सभापती अजित माने, चेअरमन दगडू सोळुंके, उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार विक्रम देशमुख, मुख्याधिकारी मल्लिकार्जुन पाटील, डॉ. व्ही. एल. एरंडे, एम. एम. जाधव, विनोद सोनवणे, डॉ. लालासाहेब देशमुख, डॉ. एस. एस. शिंदे, कुमोद लोभे, सुबोध गाडीवान, डी. एन. बरमदे, डॉ. उध्दव जाधव, पुंडलिक सूर्यवंशी, अजय मोरे, ए. पी. जाधव, सतीश हानेगावे, सचिन नाईकवाडे, माधव गाडीवान, डॉ. सचिन बसुदे, अजित लोभे आदींसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.