नवी दिल्ली : वृत्तसंस्था – JEE Main-NEET 2021 | 2021 साठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे JEE Main आणि NEET 2021 परीक्षेच्या नियमात मोठे बदल केले जात आहेत. नीट आणि जेईई मेनच्या विद्यार्थ्यांसाठी ही मोठी बातमी आहे. एजन्सीने दोन्ही परीक्षांच्या रँक लिस्टमध्ये जास्त वयाच्या उमेदवारांना प्राथमिकता देण्याची तरतूद हटवली (JEE Main-NEET 2021) आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) दरवर्षी JEE Main, NEET (UG), CMAT, GPAT, UGC NET सारख्या परीक्षा आयोजित करते. यापूर्वी, NEET, JEE Main च्या रँक लिस्टमध्ये त्या विद्यार्थ्यांना प्रथम संधी दिली जात असे, ज्यांचे वय जास्त आहे. उदाहरणार्थ जर दोन विद्यार्थ्यांना 720 गुण मिळाले तर त्या दोघांपैकी प्राधान्य जास्त वय असलेल्या विद्यार्थ्याला मिळेल.
हाच नियम 2020 पर्यंत प्रभावी होता परंतु 2021 पासून हा नियम हटवला आहे. जेईई मेन (JEE Main) आणि नीट 2021 (NEET 2021) ची रँक लिस्ट तयार करण्यासाठी, NTA एक टाय-ब्रेकिंग धोरणाचा वापर करणार जेणेकरून दोन उमेदवारांना एकच रँक द्यावी लागू नये.
2020 मध्ये, जेईई मेन (JEE Main) इंजिनियरिंग पेपरसाठी जी टाय-ब्रेकिंग पॉलिसी वापरली होती, त्यामध्ये गणितामध्ये सर्वाधिक गुण असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले गेले होते, यानंतर फिजिक्स आणि केमिस्ट्रीला.
जर तरीही टाय राहिले तर कमी नकारात्मक प्रतिक्रियेच्या उमेदवारांना प्राधान्य दिले गेले.
यानंतर वयाने मोठ्या उमेदवारांना प्राधान्य दिले होते.
यावेळी नीट 13 भाषांमध्ये आयोजित होत आहे –
यावेळी नीट परीक्षा नवीन पॅटर्नवर आयोजित होईल.
मेडिकल उमेदवारांकडे परीक्षेत अंतर्गत पर्याय असतील.
याशिवाय विद्यार्थ्यांकडे आपल्या पसंतीच्या भाषेत परीक्षा देण्याचा पर्याय असेल.
देशात पहिल्यांदा नीट परीक्षा 13 भाषांमध्ये आयोजित होईल.
या भाषांमध्ये आयोजित होईल परीक्षा –
ही परीक्षा इंग्रजी, हिंदी, आसामी, बंगाली, गुजराती, मल्याळम, कन्नड़, मराठी, उडिया, तमिळ, तेलुगु, उर्दू, पंजाबीसह 13 भाषांमध्ये आयोजित होईल.
फॉर्म भरतेवेळी विद्यार्थ्यांना आपल्या पसंतीची भाषा निवडता येईल.
Web Title : JEE Main-NEET 2021 | candidates neet and jee main time these changes rules read details.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Gold Price Today | सोनं खरेदीची हीच सुवर्णसंधी ! आज पुन्हा सोन्याचा दर घसरला; जाणून घ्या