नवी दिल्ली : वृत्त संस्था – देशाचे शिक्षण मंत्री डॉक्टर रमेश पोखरियाल निशंक यांनी ट्विट करून माहिती दिली आहे की, नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे एप्रिल महिन्यात होणारी जेईई मेन परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने एक पब्लिक नोटीस जारी करून सांगितले आहे की, एनटीई चार सत्रात जेईई (मेन)-2021 आयोजित करत आहे. तिची दोन सत्र झाली आहेत. पहिले सत्र 23 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आले होते, तर दुसरे सत्र 16 मार्च ते 18 मार्चच्या दरम्यान आयोजित करण्यात आले होते. मात्र, आता कोरोना संसर्गाच्या दुसर्या लाटेमुळे निर्माण झालेली गंभीर स्थिती पहाता एप्रिल महिन्यात 27,28 आणि 30 तारखेला होणारे सत्र स्थगित करण्यात आले आहे.
https://twitter.com/DrRPNishank/status/1383645361995096070
एनटीएने सांगितले की, या सत्रात आयोजित होणार्या परीक्षेची तारीख परीक्षेच्या 15 दिवस अगोदर जाहीर केली जाईल. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने परीक्षार्थींना सल्ला दिला आहे की, त्यांनी या वेळेचा उपयोग परीक्षेची तयारी आणखी चांगली करण्यासाठी करावा. विद्यार्थी NTA Abhyas App च्या द्वारे सुद्धा अभ्यास करू शकतात. विद्यार्थी परीक्षेबाबत कोणत्याही माहितीसाठी NTA ची बेबसाइट www.nta.ac.in किंवाwww.jeemain.nta.nic.in वर व्हिजिट करू शकतात. याशिवाय विद्यार्थी 011-40759000 वर फोन करून सुद्धा संपर्क करू शकतात आणि ईमेल- jeemain@nta.ac.in च्या द्वारे सुद्धा माहिती घेऊ शकतात.