बीड : बहुजननामा ऑनलाइन – Jaydatta Kshirsagar-MLA Sandip Kshirsagar | बीड जिल्ह्यात (Beed News) एक वेगळंच राजकारण पाहायला मिळतं. विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर क्षीरसागर कुटुंबातील काका-पुतण्या अनेक वेळा आमने-सामने आल्याचे दिसले. अशातच आता बीड जिल्ह्यातील तालुका दुध संघाच्या निवडणुकीमध्ये (Beed Taluka Dudh Sangh Election) विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर (NCP MLA Sandeep Kshirsagar) यांच्या पक्षाला उमेदवारही उभे करता आले नाहीत. त्यामुळे काका माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर (Jaydatta Kshirsagar) यांनी एकहाती बिनविरोध निवडणूक जिंकली आहे. आणि पुन्हा एकदा आपला गड राखला आहे. (Jaydatta Kshirsagar-MLA Sandip Kshirsagar)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
बीडच्या सहकार क्षेत्रातील तालुका दुधसंघ निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आणि त्यात काकाने बाजी मारल्यानंतर आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिका या निवडणुकांमध्ये काका-पुतण्या भारी ठरणार का? हे बघावं लागणार आहे. दरम्यान, सध्याच्या दुध संघाच्या सत्तेमुळे ग्रामीण भागातील माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरांची ताकद वाढली असल्याचे दिसत आहे. (Jaydatta Kshirsagar-MLA Sandip Kshirsagar)
माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर म्हणाले, ‘दूध संघाच्या स्थापनेपासून लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवला आहे. तो विश्वास सार्थ ठरवलाय, दुधावर प्रक्रिया करत ग्रामीण भागातील दूध उत्पादकांचा फायदा होईल, या अनुषंगाने काम करत आहोत,’ असं ते म्हणाले.
Web Title : Jaydatta Kshirsagar MLA Sandip Kshirsagar | ex minister jaydatta kshirsagar won beed taluka dudh sangh election against NCP MLA sandip kshirsagar
PM Kisan योजनेचा लाभ घेणार्या शेतकर्यांना मिळते कमी व्याजावर कर्ज, जाणून घ्या कसा घ्यावा लाभ
PM Narendra Modi | पंजाबमध्ये पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेतील चुका काय होत्या?, धक्कादायक माहिती समोर